शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

शेतकरी मागेल त्याला शेततळ्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 02:14 IST

योजनेत मिळते ५० हजारांचे अनुदान : प्रस्तावावर प्रांताधिकाऱ्यांची सहीच नाही

विजय मांडेकर्जत : शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना कृषी विभागाच्या माध्यमातून आणली होती. या योजनेत शेतकºयाला शेततळे खोदण्यासाठी पन्नास हजारांचे अनुदान दिले जाते. त्या अनुदानासाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी २०१९मध्ये आपली नावे कृषी विभागाकडे जमिनीच्या सातबारा उताºयासह दिली आहेत. गेल्या चार महिन्यात त्या प्रस्तावावर कर्जतच्या प्रांत अधिकाºयांना सही करायला वेळ मिळाला नाही. दरम्यान, आता जून महिना सुरू झाला असून आता शेतकरी कधी शेततळे खोदणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कृषी विभाग पूर्वी शेतकºयांची परवानगी घेऊन त्यांच्या शेतात शेततळे खोदून देत असे. पुढे जलयुक्त शिवार राज्य सरकारने आणले आणि त्या योजनेच्या माध्यमातून २०१६-१७ मध्ये शेततळे खोदून दिली होती. तोपर्यंत शासनाचा शेततळ्याचा प्रयोग यशस्वी होत होता, मात्र कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेततळे योजनेला मागेल त्याला शेततळे असे गोंडस नाव दिले आणि ती शेततळी खोदण्यासाठी शासनाने पन्नास हजारांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. कृषी विभागाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे शेततळे खोदण्यासाठी आवश्यक असलेला व्यास आणि खोली लक्षात घेता ती शेततळी खोदण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येतो. २०१८ मध्ये २७ टक्के शेतकºयांनी मागेल त्याला शेततळी या योजनेचे अनुदान घेऊन लाभ घेतला. राज्याचे जलसंधारण मंत्री आणि कृषी आयुक्त यांनी मागेल त्याला शेततळी याबाबत शंका व्यक्त केली होती.तसे असूनही २०१९ मध्ये कर्जत तालुक्यातील तब्बल ८४ शेतकºयांनी मागेल त्याला शेततळेसाठी शासनाचे पन्नास हजारांचे अनुदान मिळावे यासाठी अर्ज केला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रासह आपले अर्ज निर्धारित मुदतीत कृषी विभागाकडे सादर केले आहेत. त्या अर्जावर घेण्यासाठी राज्य सरकारने एक समिती निश्चित केली असून त्यात प्रांत अधिकारी हे आणि त्या समितीत जलसंधारण, लघु पाटबंधारे, कृषी या विभागाचे अधिकारी सदस्य असून त्या समितीची दर १५ दिवसांनी प्रांत अधिकारी कार्यालयात बैठक होत असते. कर्जत तालुक्यात मागेल त्याला शेततळे या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी अंतिम मंजुरीसाठी आली आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयात यादी अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी आजपर्यंत शेतकºयांशी निगडित असलेल्या आणि पावसाळ्यापूर्वी खोदून पूर्ण व्हावे अशा मागेल त्याला शेततळे या प्रस्तावावर जून उजाडला तरी सही केली नाही. त्याचा परिणाम आता शेतकरी आपल्या जमिनीत शेततळे खोदू शकत नाही कारण जून महिना उजाडला आणि कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता असताना मागेल त्याला शेततळे या प्रस्तावावर अंतिम सही झाली नसल्याने कोणताही शेतकरी आगाऊ काम करू शकत नाही. आणि दुसरीकडे शेततळी यावर्षी खोदून पूर्ण देखील होणार नाहीत, त्यामुळे २०१८ अखेरीस मागेल त्याला शेततळेसाठी प्रस्ताव सादर करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबाबत कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.च्शासनाने ज्यांना अधिकार दिले आहेत ते अधिकारी जिव्हाळ्याच्या विषयावर सही करून प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी चार-चार महिने घालवत असल्याने शेतकरी शासनावर नाराज झाले आहेत.च्त्याबाबत कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी कर्जत तालुक्याची कृषी विभागाची जबाबदारी असलेले प्रभारी कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या समितीचे निर्देश पाळले नसल्याने शेततळे मंजूर करण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याची माहिती दिली आहे.प्रस्ताव मंजुरीसाठी पूर्वीच गेला असून सहा महिने रजेवर असल्याने त्यात काय झाले याबाबत निश्चित माहिती नाही. तालुक्यातील ८४ शेतकºयांचे मागेल त्याला शेततळे हे प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता करून पाठवले आहेत.- शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीalibaugअलिबाग