शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

कौशल्यावर आधारित अभ्यासक्र म सुरू करणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:01 IST

विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

कर्जत - विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेत आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. कर्जत येथील अभिनव प्रशालेतील क्र ीडा सभागृह आणि ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास स्थानिक आमदार सुरेश लाड, कर्जतच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड, एचपीसीएलचे सी. एन. कृष्णमूर्ती, सी. एस. किरण, विनंती केसरकर, सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे, संजय हेगडे, बजाज समूहाचे किरण मुकादम आदी उपस्थित होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई यांच्याकडून अभिनव ज्ञान मंदिर संस्थेस वस्तूरूपाने मिळणाऱ्या देणगीचा स्वीकार व बजाज समूहाच्या आर्थिक मदतीतून व सेवा सहयोग मुंबई यांच्या सहकार्याने साकारलेल्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या नवीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरील क्र ीडा सभागृह व ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे खजिनदार विनायक चितळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष गणेश वैद्य यांनी प्रास्ताविकात ८३ वर्षात संस्थेने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. विनाअनुदानित शाळा चालवणे कठीण झाले आहे. शाळेचे सुमारे एक कोटीचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे याकडे शिक्षण मंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी कर्जतमधील दानशूर संतोष भोईर आणि संस्थेच्या शिक्षिका डॉ. रंजना देशमुख, डॉ. स्नेहा उपाध्ये यांनी पीएचडी केल्याबद्दल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक मोडक यांनी भाषणात विविध विषय मांडले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रीतम लाड-नानचे व रश्मी देशपांडे यांनी केले तर सचिव जनार्दन मोघे यांनी आभार मानले. याप्रसंगी भगवान भोईर, विक्रम वैद्य, वि. रा. देशमुख, माधवराव गायकवाड, मीना प्रभावळकर, वालचंद ओसवाल आदी उपस्थित होते.नापास शिक्का पुसण्यासाठी शासन प्रयत्नशीलशासनाने शिक्षण व्यवस्थेत पूरक असे आमूलाग्र बदल केले आहेत. शालेय अभ्यासक्र माबरोबर क्र ीडा नैपुण्याला गुणांमध्ये स्थान दिले आहे. तर क्र ीडा क्षेत्रात राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. अनेकदा नापास विद्यार्थी वाया जाणाºया वर्षामुळे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आपण नापास विद्यार्थ्यांची लगेच महिनाभरामध्ये परीक्षा घेऊन त्यांचा त्वरित निकाल लावल्याने हजारो विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष वाचले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यामुळे दिशा मिळाली आहे- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेnewsबातम्या