शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रोहा-अष्टमीतील गावांचा संपर्क तुटला; वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:30 IST

वरसे, रोठ, धाटावमध्ये शिरले पाणी; प्रवासी रखडले

रोहा : तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रोह्याच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडत गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण केली आहे. पुरामुळे रोहा-अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर ४ ते ५ फूट पाणी होते तर नव्याने बांधण्यात आलेल्या उंच पुलाला यंदा प्रथमच पाणी लागले आहे. पुरामुळे संपर्क तुटल्याने वाहतूक खोळंबली, आणि प्रवासीही मोठ्या संख्येने रखडले आहेत. रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटावमध्ये पुराचे पाणी शिरले.शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले. धुवाधार पावसाने कुंडलिका नदीला पूर आला. रात्री ९ नंतर नदीची पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे रोहा शहरातील नगरपालिका चौक, सावरकर मार्ग, कोर्ट रोड, मुख्य बाजारपेठ, सत्यनारायण रोड, बोहरी गल्ली, फिरोज टॉकीजलगत आदी सखल भागात पाणी साचले. पुराचे पाणि बायपास रोड, दमखाडी, रायकर पार्क, चनेवाले कॉम्प्लेक्स, डबीर चाळ, गोकुळ बिल्डिंग, मुरुड रोड, अष्टमीसह वरसे, रोठ, धाटावमध्ये शिरले. रात्रीच्या वेळी वस्तीत पाणी शिरू लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अष्टमीत रस्त्यावर पाणी भरल्याने पलीकडील गावांचा संपर्क तुटला.कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे, रोठ आधी नदीलगतच्या परिसरात पुराचे पाणी शिरले. रोठ आणि उडदवणे दरम्यान नदीवरील पालदाड पुलाला लागून पाणी वाहत होते. रात्रीपासून वाहतूक बंद राहिल्याने विद्यार्थी, कामगार, एस.टी. बसेस, कंपनी बसेस इत्यादींना सतर्कतेच्या कारणास्तव थांबविण्यात आले होते. शनिवारी बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.रोहे तालुक्यात ठिकठिकाणी पाणी शिरल्याने ११६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या ४८ तासांपासून पावसाने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपले असतानाच पुढील ४८ तास धुवाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.नागरिकांनी सतर्क राहावे, धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे, अतिवृष्टीमुळे कुंडलिकेच्या पातळीत वाढ झाली आहे. तरी नदीकाठच्या रहिवाशांनी सावध राहावे.- संतोष पोटफोडे, नगराध्यक्ष, रोहा नगरपरिषद

टॅग्स :Rainपाऊस