शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील गावे, वाड्या सुन्यासुन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:41 IST

महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक या सर्वांमुळे आजपर्यंत हे शक्य झाले आहे.

दासगाव : संपूर्ण जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. भारतात या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण भारतामध्ये लॉकडाउन आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाउनचे पालन करत संपूर्ण महाड तालुक्यातील गावे आणि खेडी सुनसान झाली आहेत. यामुळे महाडकरांना कोरोना या रोगावर मात करण्यास आज तरी यश आले आहे. यामध्ये महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक या सर्वांमुळे आजपर्यंत हे शक्य झाले आहे.रायगड जिल्ह्याशेजारी मुंबईतील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यामध्येदेखील रुग्ण सापडले आहेत. याव्यतिरिक्त महाड तालुक्याशेजारी असलेल्या पोलादपूर तालुक्यामध्ये हे रुग्ण आढळले. असे असताना मात्र महाड तालुका या कोरोनापासून अद्याप तरी बचावला आहे. याचे महत्त्वाचे कारण शासनाने केलेल्या लॉकडाउनचे पालन. काही प्रमाणात शहर सोडले तर संपूर्ण महाड तालुक्यातील गाव आणि खेड्यांमध्ये पुरेपूर केले जात आहे. त्यामुळे गजबजलेल्या गावांमध्ये आज शुकशुकाट दिसून येत आहे.सध्याच्या स्थितीत पुणे, मुंबई, राज्य, परराज्यातुन मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली. त्यामुळे १२,३५६ नागरिक हे संपूर्ण तालुक्यामध्ये आले आहेत. या नागरिकांची पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने नोंद करत या नागरिकांना होम क्वारंटाइन के ले, तर त्या त्या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर कडक लक्ष ठेवत शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास भाग पाडले. यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवण्यास महाडकरांना यश आले आहे.>प्रशासनाचे कौतुक : पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई के ली,तर अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानदारांना शिस्त लावली. आरोग्य विभागानेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच योग्य सूचना दिल्या, तपासणी के ली. महसूल विभागाने कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत ग्रामीण भागात धान्यवाटप के ले. यामुळेच कोरोना महाडमध्ये संचार करू शकला नाही. या प्रशासकीय कामाचे नागरिकांकडून कौतुकच होत आहे.