शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:25 IST

रायगड जिल्हा परिषदेचा कार्यक्रम : खालापूर येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांचा सन्मान

अलिबाग/ मोहोपाडा : रायगड जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सक्षमीकरणाचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ११६ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून गरोदर महिला आणि नवजात बालकांना सकस आहार देण्यात येत असल्याने कुपोषण आटोक्यात येण्यास मदत झाली आहे असा दावा रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उमा मुंढे यांनी केला.

बुधवारी सकाळी खालापूर पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनीस तसेच जिल्ह्यात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सक्षम करण्याचे पाऊल जिल्हा परिषदेने उचलले आहे. किशोरवयीन मुली यांच्यासह गरीब गरजू आणि होतकरू महिलांना, बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण कामे हाती घेऊन त्यांची अंमलबजावणी देखील सुरू केल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जि. परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण, आरोग्य सभापती नरेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित होते.रेणुका पाटील आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने सन्मानितम्हसळा : सावित्रीबाई फुले जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्याने रायगड जिल्हा परिषदेचे वतीने दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रायगड जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार सेवेत उत्कृष्ट काम करणाºया म्हसळा खरगावखुर्द सकलप येथील रेणुका पाटील यांना प्रदान करण्यात आला.मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रायगड जिल्हा परिषदेत संपन्न झालेल्या कार्यक्र मात रेणुका पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्र माला राजिप उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण सभापती नारायण डामसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर,अधिकारी व पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. १९९४ मध्ये अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत झालेल्या रेणुका पाटील यांनी तालुक्यात तीव्र (सॅम) आणि अतितीव्र (मॅम)कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. रेणुका पाटील यांनी त्यांचे सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याने त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षीचा आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगड