शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

रायगड जिल्ह्यात दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:27 AM

रायगड जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाºयावरील गावांना ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दिला आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाºयावरील गावांना ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दिला आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पुढील ४८ तासात वादळी वाºयाचा वेग ६० ते ७० किमी प्रति तास राहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करु नये. तसेच जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तत्काळ सुरक्षित बंदरावर आसरा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता ५.०१ मीटर उंचीची समुद्रास भरती असणार आहे. त्यामुळे सखल व किनाºयालगतच्या भागातील नागरिकांनी दक्षता घ्यावी.किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. वादळाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२१४१ २२२११८ / २२२०९७ / २२७४५२ तसेच टोल फ्री नंबर १०७७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी के लेआहे.