शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

Vidhan Sabha 2019: कर्जत मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:57 IST

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, मात्र अद्याप शिवसेनेचा उमेदवार कोण? याबाबत ठोस निर्णय झाला नाही.

कर्जत : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, मात्र अद्याप शिवसेनेचा उमेदवार कोण? याबाबत ठोस निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान आमदार सुरेश लाड यांनाच पुन्हा उमेदवारी देणार आहे, यात शंका नाही. भाजपच्या वतीने माजी आमदार देवेंद्र साटम यांनी बैठकासुद्धा सुरू केल्या आहेत. भाजप - शिवसेना युतीची घोषणा होत नाही तोपर्यंत कोणा कोणात लढत होईल हे स्पष्ट होणार नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.यंदाच्या कर्जत विधानसभा निवडणुकीची परिस्थिती २०१४ च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. त्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेकापक्ष हे प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड निवडून आले होते. शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांना तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले कारण ऐन वेळेला उमेदवारी न मिळालेले महेंद्र थोरवे यांनी बंड पुकारून शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी स्वीकारून अगदी विजयासमीप झेप घेतली होती; परंतु थोडीशी ‘भाऊबंदकी’ आड आल्याने त्यांचा अवघ्या अठराशे मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांनी पुन्हा शिवबंधन बांधले.शिवसेना - भाजप युती शंभर टक्के होणार असे दोन्ही जबाबदार नेत्यांकडून बोलले जाते. जागावाटपाचा मुहूर्त घटस्थापनेच्या दिवशी काढला आहे. त्या वेळी युतीतर्फे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली जाईल ते समजेल. माजी आमदार देवेंद्र साटम यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यांनी बूथ कमिट्यांचे अध्यक्ष व शक्ती केंद्राच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना संबोधित केले. शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी आठ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दोन वेळा या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला आहे; त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा असे खासगीत बोलले जाते.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - शेतकरी कामगार पक्ष यांची आघाडी आहे. कर्जतची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, तसेच जयंत पाटील आदींची ईडी चौकशी होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक आहे.खरे तर या मतदारसंघात शिवसेनेची नव्वद हजारांपेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मागीलवेळी बंडखोरी करून शेकापक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले महेंद्र थोरवे, शिवसेनेचे मागील वेळचे उमेदवार हनुमंत पिंगळे, २००४ मध्ये शेकापक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले सध्या शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख असलेले संतोष भोईर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर आदींचा समावेश आहे. ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्या वेळी खरा उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. तोपर्यंत उमेदवार गुलदस्त्यातच राहील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना