शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

चौपदरीकरणात विहीर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:02 IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हळूहळू वेग धरत आहे. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान सर्वच गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात कामास प्रारंभ झाला आहे

सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हळूहळू वेग धरत आहे. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान सर्वच गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात कामास प्रारंभ झाला आहे. देऊळ, मशिद, शाळा यासारख्या सार्वजनिक सुविधा बाधित होत असतानाच दासगाव गावातील बारमाही पुरवठा करणारी विहीर चौपदरीकरणाच्या कामात बाधित होणार आहे. आज या विहिरीच्या बाधित होण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. ही विहीर बाधित होत असताना त्याचा फटका दासगावच्या दरडग्रस्त राहत असलेल्या पत्रा शेडला बसणार आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. जमीन मालक शेतकºयांची देणी बºयाच प्रमाणात पूर्ण झाली असून ठेकेदार कंपनीने चौपदरीकरणाच्या कामासाठी जागांचा ताबा घेतला आहे. पोकलेन जेसीबीच्या माध्यमातून खड्डे मारून चौपदरीकरणाची हद्द निश्चित करणे, पाइपच्या मोºया टाकणे, पाणीपुरवठा योजनांची कामे आदी कामांना प्रारंभ झाला आहे. शासकीय आदेशानुसार चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दूरध्वनी व्यवस्था आणि पाणीपुरवठा या अत्यावश्यक बाबी खंडित होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायची आहे. राष्टÑीय महामार्ग विभाग, ठेकेदार कंपनी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या माध्यमातून ही काम केली जात असताना दासगावमधील आपद्ग्रस्तांच्या नवीन वसाहतीला पाणीपुरवठा करणारी एक विहीर दुर्लक्षित झाली आहे.महाड तालुक्यातील दासगाव हे महत्त्वपूर्ण गाव असून शिवकाळाआधीपासून बंदर म्हणून दासगावची इतिहासात नोंद आहे. २००५ मध्ये महापूर आल्यानंतर कोसळलेल्या दरडीनंतर दासगाव पुन्हा एकदा जगाच्या पटलावर आले. याच दरडग्रस्तांसाठी दासगावच्या हद्दीमध्ये मुंबई - गोवा महामार्गालगत पत्राशेड बांधून वसाहत तयार करण्यात आली आहे. या वसाहतीला वर्षातून चार ते पाच महिने महामार्गालगत शेडपासून जवळच असलेल्या विहिरीवर अवलंबून राहावे लागते. ही विहीर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बाधित होत असल्याने दासगाव आपद्ग्रस्तांच्या पत्रा शेड या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.पत्रा शेडजवळ आणि महामार्गालगत असलेल्या या विहिरीला वर्षाचे १२ महिने पिण्याचे योग्य पाणी आहे. दासगावमध्ये कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू झाला की क ोतुर्डे धरणाची पाण्याची पातळी खाली जाते. यामुळे दासगावसह ७ गावांना या पाणीपुरवठा योजनेमार्फत होणारा पाणीपुरवठा खंडित होतो.यावेळी प्रत्येक गावात असणाºया उपलब्ध पाणी स्रोतावर ग्रामस्थांची भिस्त असते. पत्रा शेड या टंचाईच्या काळात याच महामार्गालगत असलेल्या विहिरींवर पूर्णपणे अवलंबून असते.चौपदरीकरणाच्या कामात आता ही विहीर बाधित होत असल्याने पत्रा शेड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विहिरीकडे दुर्लक्ष१दासगाव गाव हद्दीतील पत्रा शेडशेजारी महामार्गालगत असलेली ही विहीर सद्यस्थितीत महामार्गाला लागून असल्याने भविष्यात होणाºया चौपदरीकरणात मध्यभागी ही विहीर येणार आहे.२ही विहीर वाचवता येणे शक्य नाही. मात्र ही विहीर बाधित होत असताना या विहिरीवर पाण्यासाठी अवलंबून असणाºया ग्रामस्थांचा विचार केला गेलेला नाही.३दासगाव गाव हद्दीत चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. काम करीत असताना ठेकेदार कंपनीने विहिर नष्ट के लीतर आपद्ग्रस्तांच्या पत्रा शेडला वहूर गाव हद्दीतून अगर दासगाव गावातून १ किमी अंतरावरून पाणी आणल्याशिवाय पर्याय राहणार नाही.४दासगाव आपद्ग्रस्त पत्रा शेडला स्वत:चा असा पाण्याचा उद्भव नाही. शासनाने त्यांना जमिनी देखील हस्तांतरित केल्या आहेत. टंचाई सुरू झाल्यानंतर सुमारे १ ते २ किमी दूरहून पाणी आणल्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय राहणार नाही. पाण्यासाठी ही वणवण चौपदरीकरणाचे काम सुरू असताना करावी लागणार असल्याने या ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे.