शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैध मापनशास्त्र यंत्रणेची पनवेलमध्ये कारवाई, २५ आस्थापनांविरुद्ध खटले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:33 IST

पनवेल महानगरपालिकाक्षेत्रात दूध, शीतपेय आदी आवेष्टित वस्तूंची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी ३२ व्यावसायिकांविरुद्ध तर किमतीत खाडाखोड करून विक्री केल्याप्रकरणी ६ व्यावसायिकांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र यंत्रणेने कारवाई केली.

- जयंत धुळप ।अलिबाग : पनवेल महानगरपालिकाक्षेत्रात दूध, शीतपेय आदी आवेष्टित वस्तूंची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी ३२ व्यावसायिकांविरुद्ध तर किमतीत खाडाखोड करून विक्री केल्याप्रकरणी ६ व्यावसायिकांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र यंत्रणेने कारवाई केली. याबाबतची माहिती जिल्हा वैध मापनशास्त्र सहायक नियंत्रक सी. सा. कदम यांनी दिली.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैध मापनशास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेमार्फत वैध मापनशास्त्र अधिनियम २००९ व त्याअंतर्गत नियमातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाते. गेल्या पाच महिन्यांच्या कालखंडात ही कारवाई कोकण विभागीय वैध मापनशास्त्र नियंत्रक तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक ध. ल. कोव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दूध व शीतपेय आदी आवेष्टीत वस्तूंची जादा दराने विक्र ी होत असल्याबाबत तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात व्यापारी आस्थापनांची तपासणी करून एकूण २५ आस्थापनांविरु द्ध खटलेदेखील दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये प्रामुख्याने दूध व शीतपेयांची जादा दराने विक्र ी करणे, आवेष्टीत वस्तूंवर नियमानुसार उद्घोषणा नसणे व व्यापाºयाकडील वजने काटे विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करून न घेणे आदी उल्लंघन संबंधित आस्थापनांकडून झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत संबंधित आस्थापनांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही चालू आहे.आवेष्टनांवर नियमानुसार माहिती अनिवार्यवैध मापनशास्त्र अधिनियम २००९ व त्याअंतर्गत नियमातील तरतुदींनुसार व्यापारी व औद्योगिक आस्थापनांकडे वापरात असलेली वजने मापे यांची नियतकालीक पडताळणी व मुद्रांकन करणे, तसेच आवेष्टीत (पॅकबंद) वस्तूंवर नियमानुसार उद्घोषणा असणे आवश्यक आहे.आवेष्टीत वस्तूंवर उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता, वस्तूचे नाव, वस्तूचे निव्वळ वजन, माप, पॅकिंग तारीख, कमाल विक्र ी किंमत (सर्व करांसहित), ग्राहक तक्र ार निवारण क्र मांक व ई-मेल, पत्ता आदी उद्घोषणा लिहिणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याचबरोबर छापील किमतीपेक्षा जास्तदराने विक्र ी, किमतीत खाडाखोड करणे व वस्तू वजन मापात कमी देणे आदी बाबी कायद्यानुसार गुन्हा ठरतात, असे कदम यांनी स्पष्ट केले.येथे तक्रार कराआवेष्टीत वस्तूंची जादा दराने विक्र ी, किमतीत खाडाखोड वा वजन मापात कमी देणे, याबाबत ग्राहकांना माहिती मिळाल्यास अथवा शंका असल्यास वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या हेल्पलाइन क्रं. ०२२-२२६२२०२२ वर संपर्क साधून तक्र ार नोंदवावी, असे आवाहन रायगड वैध मापनशास्त्र सहायक नियंत्रक सी. सा. कदम यांनी केले आहे.