शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वडखळ एस टी स्थानक अस्वच्छतेने ग्रासले, प्रवासी करत आहेत उघड्यावर लघुशंका

By राजेश भोस्तेकर | Updated: August 16, 2023 19:24 IST

वाहतूक विभागाचे मात्र दुर्लक्ष

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: वडखळ एस टी स्थानक हे विविध समस्येने ग्रासले आहे. स्थानकात प्रवाशांना स्वच्छतागृहाचीही सुविधा नसल्याने उघड्यावर लघुशंका करण्याची वेळ आली आहे. स्थानकातील या आणि इतर असुविधेबाबात वाहतूक विभागाकडूनही दुर्लक्ष होत आहे. स्थानकातील सोयी सुविधासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्यवृती एस टी स्थानक आहे. मुंबई, ठाणे येथून जिल्ह्यात तसेच कोकणात जाणाऱ्या एस टी बसेस वडखळ स्थानकातून जात असतात. एकेकाळी वडखळ बस स्थानक हे सोयी सुविधा युक्त होते. मात्र काही वर्षांपासून या स्थानकाची दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. 

वडखळ स्थानकात स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. मात्र गेली अनेक वर्षापासून या स्वच्छतागृहाची स्वच्छता केली गेलेली नाही आहे. मुंबई, ठाणे मार्गावरून कोकण कडे जाणाऱ्या बसेस थांबल्यानंतर प्रवासी हे लघु शंकेसाठी उतरतात. मात्र स्थानकात असलेले स्वच्छतागृह हे अस्वच्छ असल्याने ते वापरण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना बाजूला उघड्यावर उभे राहून लघु शंका करावी लागत आहे. पुरुष हा आड बाजूला जाऊन हे करू शकतो. महिला प्रवासी यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

स्थानकाचा परिसर ही अस्वच्छ असून प्रवाशांना बसण्यासाठीही असलेली जागा अस्वच्छ आहे. स्थानक परिसर हा खड्डेमय झाला असून पावसाळ्यात पाणी साचल्याने पाण्यातून प्रवाशांना बस पकडावी लागत आहे. उघड्यावर लघु शंका प्रवासी करीत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र स्थानकाच्या या दुरावस्थेकडे पाहण्यास जिल्हा वाहतूक विभाग प्रशासनाला वेळ नाही का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकीकडे स्थानक स्वच्छता स्पर्धा परिवहन मंडळ तर्फे सुरू असताना वडखळ स्थानक कधी स्वच्छ होणार याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Raigadरायगड