शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 09:49 IST

कर्जत तालुक्यात एकूण ३८ आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र २२ आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य समुदाय अधिकारी असल्याने त्या केंद्रांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली.

विजय मांडे -कर्जत : कर्जत शहरात लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असताना ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू करून पावणेतीन हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. या केंद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येत असून ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.कर्जत तालुक्यात एकूण ३८ आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र २२ आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य समुदाय अधिकारी असल्याने त्या केंद्रांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. या आरोग्य उपकेंद्रांसाठी दोन हजार ७५० कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्याने त्या - त्या भागातील लोकांचे लसीकरण झाले. या केंद्रांवर ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.कर्जत शहरात एकच लसीकरण केंद्र आहे. त्या लसीकरणाचा दोन दिवसांपासून गोंधळ सुरू होता. कर्जत उपजिल्हा केंद्रांवर असलेले लसीकरण केंद्र कोविड  सेंटर असल्याने १ मे पासून बंद केले होते. त्यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी वणवण सुरू झाली. दरम्यान अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर शाळेमध्ये गुरुवारी सुरू झालेले लसीकरण जेमतेम दोन दिवस सुरू ठेवून बंद झाले. आणि पुन्हा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू केले. मग डेडिकेटेड कोविड सेंटर आता अडचण ठरत नाही काय? असा प्रश्नआहे.शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील लोकांना चांगली सुविधा मिळाली आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य, शिक्षण व क्रीडा सभापती सुधाकर परशुराम घारे यांचे प्रयत्न कामी आले. काही भागात दोन - अडीच किमीरवर केंद्र असल्याने त्या परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत. मोहिली आरोग्य केंद्रापासून खांडपे अडीच किलोमीटरवर आहे. आता या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीची प्रतीक्षा आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य उप केंद्रांना लसीकरणाची परवानगी दिल्याने त्या - त्या भागातील लोकांना लसीकरण करणे सोयीचे झाले आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविशिल्ड लस देण्यात येते. पुढील आदेश मिळाल्यानंतर १८ ते ४४ वर्षांच्या व्यक्तींना लसीकरण करता येईल.'    - डॉ. सी. पी. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRaigadरायगडdoctorडॉक्टर