शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लसीकरण चार दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:47 IST

गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीचे अस्त्र : अलिबागमध्ये लस मिळत नसल्याने नागरिक हैराण

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने गेल्या चार दिवसांपासून ८४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प झाले आहे. लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी फिरावे लागत आहे. नाेंदणी करूनदेखील लस उपलब्ध हाेत नसल्याने नागरिक मात्र कमालीचे हैराण झाले आहेत. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी केंद्राच्या २०० मीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात काेराेना महामारीचा फैलाव अद्यापही थांबलेला नाही. वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांचे मृत्यू यांना आवर कसा घालायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे.सरकारने लाॅकडाऊन केले आहे, मात्र अद्यापही त्याचा म्हणावा तसा सकारात्मक परिणाम दिसत नाही. रुग्णवाढीचा वेग मंदावण्यासाठी पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे आराेग्य विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विविध उपाययाेजना करतानाच सरकारने प्रभावीपणे लसीकरण माेहीम राबवण्याचे घाेषित केले. यासाठी फ्रंटलाइन वर्कर, आराेग्य सेवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या लसीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत हाेते. १ मेपासून १८ ते ४४ वयाेगटाला लस देण्याचे काम सुरू आहे. मात्र १८ ते ४४ वयाेगट वगळता अन्य ८४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प पडले आहे. लसीकरणासाठी नाेंदणी केली आहे, मात्र केंद्रावर लसच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आम्हाला परतावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

गेल्या आठवड्यात सुमारे १२ हजार लसींचा साठा प्राप्त झाला हाेता. चार दिवसांपूर्वीच ताे संपलेला आहे. सरकारकडे नव्याने मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आठ दिवस झाले तरी लसच मिळालेली नाही. लसच नसल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतील ८४ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. लस प्राप्त हाेताच पुन्हा लसीकरण करण्यात येईल, असे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी सुमारे १० हजार डाेस आले हाेते. पाच केंद्रांवर प्रत्येकी दाेन हजार देण्यात आले हाेते. सध्या याच वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यातील पनवेल येथे तीन, अलिबाग आणि पेण येथे प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केला आहे, मात्र अलिबागमधील साठा संपलेला आहे. तसेच अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. जिल्ह्यासाठी आलेला साठा संपलेला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. लसींचा साठा कधी मिळणार, याकडे सर्वांचेच डाेळे लागले आहेत.

२०० मीटर परिसरात मज्जावलसीकरण करण्यासाठी माेठ्या संख्येने नागरिक केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र लसींचा साठा संपला आहे. फक्त १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना लस टाेचली जात आहे. या वयाेगटाव्यतिरिक्त अन्य काेणालाही लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरात येण्यास मज्जाव केला आहे. जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. नागरिक निष्कारण केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराचे भान राखले जात नाही. त्यामध्ये काेराेना संसर्गाचा धाेका वाढण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने या ठिकाणी संचारबंदीचे अस्त्र वापरले असल्याचे बाेलले जाते.

nलसीकरणासाठी पनवेल येथे तीन, अलिबाग, पेण येथे प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केला आहे, मात्र अलिबागमधील साठा संपलेला आहे.

जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. पुढील दाेन दिवसांत लस उपलब्ध झाल्यावर वेगाने लसीकरण सुरू हाेईल. सध्या १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.- डाॅ. सुधाकर माेरे, जिल्हा आराेग्य अधिकारी, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCorona vaccineकोरोनाची लस