शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भरावासाठी मुरुम-माती ऐवजी डेब्रिजचा वापर; ठेकेदारांनी सिडको-जेएनपीएला लावला शेकडो कोटींचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:42 IST

ठेकेदारांकडून होणाऱ्या या फसवणूकीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडको-जेएनपीएला धारेवर धरुन भरावासाठी वापरण्यात आलेले  टाकाऊ डेब्रिज काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

 - मधुकर ठाकूर 

उरण : जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपासाठी सुरू असलेल्या १११ हेक्टर क्षेत्रातील भरावासाठी ठेकेदारांनी माती,मुरुम, दगडांऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा मोठ्या प्रमाणावर वापर करून सिडको -जेएनपीएला शेकडो कोटींचा चुना लावला आहे. ठेकेदारांकडून होणाऱ्या या फसवणूकीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडको-जेएनपीएला धारेवर धरुन भरावासाठी वापरण्यात आलेले  टाकाऊ डेब्रिज काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे ठेकेदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.    सिडकोने जेएनपीए बंदरासाठी नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार,सोनारी, बेलपाडा,पाणजे,डोंगरी, फुडें आदी गावातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची २७०० हेक्टर जमीन संपादन केली आहे.संपादन केलेल्या जागेपोटी खातेदार असलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या १२००० वारसांना जेएनपीएने ३४ वर्षांनंतरही साडेबारा टक्के विकसित भुखंडाचे वाटप केलेले नाही.भुखंड वाटपासाठी १४५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.मात्र जेएनपीएने काही गावांना  गावठाण विस्तारासाठी जमिन दिल्याचे कारण पुढे करून साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपासाठी फक्त १११ हेक्टर जमीन जमीन आरक्षित केली आहे. 

जेएनपीएने साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप करण्यासाठी रांजणपाडा, जासई  दरम्यान आरक्षित करण्यात आलेल्या १११ हेक्टर क्षेत्रावर भराव सुरू केला आहे . या कामासाठी ३७९ कोटी रुपये खर्चाची तरतूदही जेएनपीएने केल्यानंतर भरावयाचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र ठेकेदारांनी माती-मुरुम- दगडाच्या भरावाऐवजी चक्क मुंबई, नवीमुंबईतुन फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर केला आहे.हे टाकाऊ डेब्रिज फुकटात तर मिळतेच त्याशिवाय उलट एका डंपरमागे २००- ते ३०० रुपये डेब्रिज टाकणाऱ्यांकडून दिले जातात.

अशाप्रकारे ठेकेदारांनी एकीकडे सिडको-जेएनपीएकडुन भरावाचे तर दुसरीकडे फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर आणि त्यापोटी मिळणारे पैसे अशी दुहेरी कमाई करुन कोट्यावधी रुपयांचा चुना लावला आहे. सिडको-जेएनपीए फसवणुक करून कोटींवधींची कमाई केली आहे.ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर आणि याविरोधात जेएनपीए  आणि संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींनंतर भरावाचे काम सिडकोने मे २०२३  पासूनच बंद केले असल्याची माहिती जेएनपीए कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी दिली.

टाकाऊ डेब्रिजचा भरावासाठी वापर केल्याने जेएनपीएने पुनर्वसन केलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.टाकाऊ डेब्रिजच्या वापरामुळे ठेकेदार गब्बर होत असले तरी भरावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.याबाबत पुराव्यानिशी सिडकोकडे तक्रारी केल्या कारवाईची मागणी करण्यात आली असल्याची माहिती माजी जेएनपीए कामगार ट्र्स्टी भुषण पाटील यांनी दिली.

टॅग्स :cidcoसिडको