शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

एमएमआरडीएविरोधात उरणकरांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:46 IST

एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

उरण : एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संध्याकाळी नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाने आपणे म्हणणे जोरदारपणे मांडत बिल्डरधार्जिण्या आराखड्याचा निषेध केला.शिष्टमंडळ मंचाचे मार्गदर्शक चंद्रशेखर प्रभू, आ. मनोहर भोईर, उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, सुधाकर पाटील, संजय ठाकूर आदिंचा सहभाग होता. यावेळी आ. भोईर यांनी येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातून उरणच्या पूर्व भागातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. तत्पूर्वी आझाद मैदान सरकारविरोधी घोषणांनी दुमदुमले.मंचावर उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, शैलेंद्र कांबळे, सुधाकर पाटील, भूषण पाटील, रुपेश पाटील, जॉन परेरा, भावना म्हात्रे आदिंनी सरकारच्या धोरणाचा निषेध करत बिल्डरधार्जिणा आराखडा रद्द करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेवून सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला आराखडा बनवावा, अशी मागणी केली. या आंदोलनात आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, आ. गावीत यांनी पाठिंबा दिला. तर माजी आ. विवेक पाटील उपस्थित न राहू शकल्याने पाठिंब्याचे पत्र दिले.विधिमंडळात आ. धैर्यशील पाटील यांनी लक्षवेधी दाखल केली असून ती लवकरच पटलावर येईल. काल एका अन्य प्रकरणात सभागृहाचे कामकाज तहकूब झाले होते. उरण तालुक्यातून कामगार नेते श्याम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष ठाकूर, जीवन गावंड, विनोद म्हात्रे, पं. स. सदस्या शुभांगी पाटील, सुरेश पाटील, संतोष पवार, विलास गावंड, शेखर ठाकूर, विनायक मोकल, मेघनाथ मोकाशी, गुरुनाथ गावंड, संदीप पाटील, सुभाष कडू यांच्यासह गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व जनता आंदोलनात सहभागी झाली होती.