शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

उरणकरांना प्रतीक्षा ‘मोरा-मुंंबई रो-रो’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:31 IST

केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा: दोन वर्षांपासून प्रस्ताव लालफितीत; ६५ कोटींचा खर्च अपेक्षित

मधुकर ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : अवघ्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असणाऱ्या मांडवा-भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा येत्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यापाठोपाठ केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी लालफितीत अडकून पडलेल्या ६५ कोटी खर्चाची मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवाही मार्गी लागावी, अशी अपेक्षा उरणकरांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान अवघे नऊ किमी इतके सागरी अंतर आहे. मुंबईपासून जवळ आणि वाहतुकीस सोयीचे असल्याने या सागरी जलमार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. अर्धा-पाऊण तासात मुंबई गाठणे सहज शक्य होत असल्याने जलमार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये कामगाराचाही मोठा समावेश आहे.

सागरी मार्गावर मागील ७० वर्षांपासून प्रवासी वाहतूक करीत असलेल्या खासगी लॉन्चसाठी नेहमीच गर्दी असते. त्यामध्ये आता जेएनपीटी बंदर आणि या बंदरावर आधारित असलेल्या सीएफएस कंपन्यांची भर पडली आहे.जेएनपीटी बंदर आणि बंदरावर आधारित सीएफएस कंपन्यांकडे विविध कामांसाठी येणाºया कामगारांची संख्या मोठी आहे. मुंबईहून जेएनपीटी बंदर परिसरात येणाºया कामगारांना येण्यासाठी ६०-७० किमी अंतर पार करावे लागते. यासाठी साडेतीन ते चार तास लागतात.

वाहतूककोंडी उद्भवल्यास आणखी जास्त वेळ लागतो. याशिवाय इंधनावरही अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यामुळे उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान खासगी प्रवासी लॉन्चसेवेवरील ताण कमी करण्यासाठी आणि वेळ, इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.महत्त्वाकांक्षी सागरमाला योजनेंतर्गत प्रकल्प१उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात येणाºया आणि केंद्र सरकारच्या सागरमाला या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रकल्पाला राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून दोन वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.२या रो-रो योजनेअंतर्गत २० ते ३० वाहन क्षमतेची वाहतूक करणाºया बोटींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कामगार, प्रवाशांना आपल्या वाहनांसह तासाभरात मुंबई गाठणे सहज शक्य होणार आहे.३उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात येणाºया प्रस्तावित रो-रो सेवेमुळे वेळ, इंधनावर होणारा खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे.रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या मांडवा-भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा येत्या १७ फेब्रुवारीपासून सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी लालफितीत अडकून पडलेली ६५ कोटी खर्चाच्या योजनेची मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवा सुरू होण्याची हजारो उरणकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

केंद्र सरकारच्या सागरमाला या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पावर ६५ कोटी खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर सदर प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावाबाबत सातत्याने केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.- सुधीर देवरे,कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड