शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उरण : चिरनेर परिसरात दलालांचा सुळसुळाट, सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:53 IST

वाढत्या भरावामुळे चिरनेर गावाला पुराचा वाढता धोका, पुढील पिढ्यांचे आयुष्य अंधारात 

मधुकर ठाकूर उरण परिसरातील खाडीकिनारी तसेच खाडीच्या बाजूस असलेल्या सोन्यासारख्या पिकत्या जमिनी दलालामर्फत कवडीमोल भावात विक्री केल्या जात आहेत.याच शेतजमिनींवर विकासक, भांडवलदार  मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिरनेर आणि चिरनेर परिसराला दलालांचा वेढा पडला आहे.विकासाच्या नावाखाली  बाहेरील  खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजकांनी वाडवडिलांनी राखुन ठेवलेल्या पिढीजात जमिनी  शेतकऱ्यांना भुरळ घालून त्यांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गावागावात दलाल नेमले आहेत. या दलालांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.हे दलाल शेतकऱ्यांना भुलथापा मारीत आणि भविष्याची गोड स्वप्ने दाखवून अगदी कवडीमोल भावाने येथील जमिनींची खरेदी करीत आहेत.

जमीनी खरेदी केलेले खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजक दलाल विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाडी, खाडी किनारी,नाले, सीआरझेड परिसरात बहुतांशी जमिनीवर मातीचा भराव केला जात आहे.मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडी, खाडी किनारे, नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही.

यामुळे परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. यामुळे गावातील सखल भागात पाणी साचून या भागातील घरे पुराच्या पाण्याखाली  जातात. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय येथील नागरीकांच्या जीविताला मोठा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून  जीवन जगावे लागत आहे. 

पुढील पिढ्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे यासाठी खाजगी खाजगी भांडवलदार,विकासक,  उद्योगजकांना आपल्या सोन्यासारख्या जमिनी शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने विकू नका असे आवाहन मातृछाया जनसेवा फाउंडेशनच्या उरण तालुका महिला अध्यक्षा सविता खारपाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

चिरनेर परिसरात खाजगी उद्योजकांनी जमिनी खरेदी करण्यासाठी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. भाताचे पीक, वाल, चवळी, कडधान्य पीक देणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्यामुळे येथील पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. चिरनेर परिसरात गोदामे वाहतूक कोंडी प्रदूषण यामुळे येथील नागरिक बेजार झाले असून, विविध प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान सोन्यासारख्या जमिनी खाजगी उद्योजकांना कवडीमोल भावात विकल्या जात असल्यामुळे उद्योजकांचे उखळ पांढरे झाले आहे.असे खासगी विकासक कसेही आणि कुठेही भराव करित आहेत.यामुळे परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते असल्याची संतप्त प्रतिक्रिया विजय भगत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :uran-acउरण