शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:33 IST

शुक्रवारी सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उरण : उरण तालुक्यात शुक्रवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागाव गावातील एका रहिवाशाच्या घरावर झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विविध ठिकाणी रस्त्यांंवर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, उरण नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, जेएनपीटी, आपतकालीन व्यवस्थापन तसेच संबंधित खात्याच्या प्रशासनाने पावसाळी पाणी निच-याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.शुक्रवारी सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरण तहसील, उरण नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, जेएनपीटी, आपतकालीन व्यवस्थापन तसेच संबंधित खात्याच्या प्रशासनाने पावसाळी पाणी निच-याची व्यवस्थाच न केल्याने उरण शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. तसेच भाजी मंडईतही पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली.उरण - पनवेल रस्त्यावरील काही भागात पावसाचे पाणी साचले आहे, तसेच सोनारी, जासई, चिर्ले आदी गावातील सखल भागात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्याने रहिवाशांना विद्युत पुरवठा करणारे मीटर तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत. नागाव गावातील एका रहिवाशाच्या घरावर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड दूर करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Rainपाऊस