शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Uran: हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चेनंतरही ठोस तोडगा नाही, जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 21:41 IST

Raigad : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.  

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.  सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची  विचारविनिमय करण्यासाठी तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली आहे.त्यामुळे जेएनपीए विरोधात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम आहे. 

जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे. मात्र या जागेची मालकी जेएनपीएकडे असली तरी प्लानिंग ॲथोरिटी सिडको आहे.त्यामुळे जेएनपीए टाऊन प्लॅनिंग विभागाच्या मंजुरीनंतरही आराखड्याला सिडकोची मंजुरी आवश्यक असल्याने मंजुरीसाठी सिडकोकडे पाठविण्यात आला आहे.जेएनपीए रचनाकार विभागाने तयार केलेल्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत.हा त्रुटी असलेला आराखडा  मंजुरीसाठी वारंवार जिल्हा टाऊन प्लॅनिंग, सिडको आणि बोर्ड ऑफ ट्र्स्टीच्या बैठकीत ठेवून जेएनपीएने वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा आरोप हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी केला आहे. त्रुटी दूर करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आराखडाच मागील काही महिन्यांपासून शासनाच्या लालफितीत अडकलेला असल्याने मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमधील असंतोषाची भावना अनावर झाली आहे.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी   जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे, मनिषा जाधव, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, रविंद्र पाटील, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,वपोनि संजीव धुमाळ, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी,हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाबाबत असलेल्या विविध त्रुटींबाबत चर्चा झाली. आराखड्यातील आवश्यक  त्रूटी दूर करण्याची तयारीही जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन दर्शवली आहे.मात्र सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची  विचारविनिमय करण्यासाठी आजच तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती  हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड