शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:12 IST

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मुरुड : गुरुवारी रात्री १०. ३० नंतर मुरुड तालुक्यात जोरदार वारे सुटल्यामुळे येथील नागरिक भयग्रस्त झाले होते. तर शुक्रवारी सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या होड्यांनी पुन्हा किनारा गाठला आहे. ढगाळ वातावरणाचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे.होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.मुरुड तालुक्यासह रोहा, बारशीव व अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीने पाऊस पडला आहे. बहुतांशी भागातील होड्या किनाऱ्याला लागलेल्या आढळून आल्या आहेत. तर काही बोटींनी मुंबई येथे आसरा घेतला आहे. हवामान खात्याने पहिलेच अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे अवकाळी पाऊस काही भागात पडला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण पुढे आठ ते दहा दिवस राहिल्यास मच्छीमारांचे मोठे हाल होणार आहेत. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी तुटपुंजी सापडत असल्याने बोटीवर होणार खर्चसुद्धा निघत नाही. त्यातच डिझेलचे वाढते भाव व रेशनिंगचे वाढलेले भाव यामुळे मच्छीमारांची स्थिती चिंताजनक झाली आहे. मच्छीमार मासळी पकडण्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम करीत नाहीत. केवळ मासळी पकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. अन्य मार्गाने कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने केवळ मासळीवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे.शासनाकडून अद्यापर्यंत डिझेल परतावा रक्कमसुद्धा अदा करण्यात आलेली नाही. क्यार व चक्री वादळाची मदतसुद्धा काही मच्छीमार सोसयट्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या मच्छीमार अनेक संकटावर मात करून जीवन कसेबसे जगत आहेत.

सनाकडून मिळणारी मदत तुटपुंजीरायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांच्याशी संपर्क साधला असता हवामान खात्याने अगोदरच सूचना केली होती. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस व ढगाळ वातावरण राहिले आहे. काही भागात जोरदार वारेसुद्धा वाहिले आहेत. त्यामुळे मच्छीमार बोटींनी जिथे मिळेल तिथे आसरा घेतला आहे. मासेमारीची आता फक्त तीन महिने बाकी राहिले आहेत. येणाऱ्या तीन महिन्यात मासळी मुबलक प्रमाणात मिळणे खूप गरजेचे आहे. जून महिन्यापासून मासेमारी बंद असते. अशावेळी आगामी तीन महिन्यावर मच्छीमारांचे जीवन निर्भर असणार आहे. शासनाकडून मिळणारी मदत ही फारच तुटपुंजी व वेळखाऊ असणारी असते. आता तरी शासनाने मच्छीमारांना विशेष पॅकेज जाहीर करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड