शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणे आवश्यक- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:47 IST

गोरेगावमधील १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदत

माणगाव : कोविड १९च्या काळात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्याचे माझ्यासह सर्वच पालकांना आणि विद्यार्थ्यांना टेन्शन आहे. परीक्षा घ्याव्या, असे युसीजी म्हणते, तर परीक्षा घेण्यास राज्य सरकार तयार नाही. याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याचा १० ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे, पण आता हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्राध्यापकांना त्यांची मते पाठविण्याचे आवाहन केले.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १०० संगणक आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी गोरेगाव येथील दोशी वकील महाविद्यालयात करण्यात आले. त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, विद्यापीठाचे जॉइंट डायरेक्टर संजय सावंत, सरपंच जुबेर अब्बासी आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे, याबाबत शिक्षक व प्राध्यापक वर्गाच्या सूचना मला मिळाल्या, तर त्याबाबत आम्हाला आमचे मत मांडता येईल, असे सुळे यांनी सांगून तशा सूचना करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.खा. सुनील तटकरे यांनी गेल्या ८ ते १० वर्षांतील दहावी व बारावीचे निकाल पाहिले, तर त्यात कोकण नेहमी अव्वल असतो. चक्रीवादळानंतर शरद पवार यांनी कोकण दौरा केला त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतरच आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याची सूचना राज्य सरकारला केली. इतकेच नव्हे, तर पक्षाच्या माध्यमातून कोकणातील नुकसानग्रस्त महाविद्यालयांना पत्रे, संगणकांची मदत केल्याचे सांगितले.अदिती तटकरे यांनी पक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयांना केलेल्या मदतीची माहिती दिली.यावेळी सर्व लाभार्थी महाविद्यालयांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीची पत्रे देण्यात आली, तसेच गोरेगांव येथील दहावी व बारावीतील पहिल्या तीन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.माणसे पाहिली की बरं वाटतंकोरोनोच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आॅनलाइन होणाऱ्या बैठकांबाबत विचारले असता, झूम कॉल्स बरेच झाले, व्हीसी झाली. आता कंटाळा आला. आता माणसं पहिली की बरं वाटतं. कारण माणुसकीचा वा नात्याचा ओलावा तो फोनमधून येत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे