शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

‘आई डे केअर’चे अनोखे रक्षाबंधन

By admin | Updated: August 28, 2015 23:20 IST

आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी पेण येथे झालेल्या लोकमत-वार्ताहर कार्यशाळेत आई डे केअरच्या विशेष मुलींनी लोकमतचे कार्यकारी

अलिबाग : आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी पेण येथे झालेल्या लोकमत-वार्ताहर कार्यशाळेत आई डे केअरच्या विशेष मुलींनी लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, चीफ फोटो एडिटर सुधाकर आेलवे यांच्यासह उपस्थित सर्व पत्रकारांना राख्या बांधून राखीपौर्णिमा साजरी केली. आपल्या स्वत:च्या बावीस वर्षीय गतिमंद मुलीचे तिच्या जन्मापासून पालन पोषण करीत असताना लक्षात आलेल्या समस्यांचा सकारात्मक विचार करुन स्वाती मोहिते यांनी समाजातील गतिमंद मुलांकरिता सेवाभावनेतून आई डे केअर ही शाळाच सुरु केली. समाजाच्या मूळ प्रवाहातून थोडेसे बाजूला असलेल्या गतिमंद या समाज घटकाकडे काहीना काही विशेष गुण असतोच, तो शोधून काढून त्याला कलेशी जोडून त्यास व्यावसायाभिमुख सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिल्यास गतिमंद मुले समाजाचा बोज न बनता स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात हे यंदा वास्तवात उतरल्याचे मोहिते यांनी सांगितले. मुलांच्या या यशस्वी व्यावसायिकतेमुळे त्यांचे पालक देखील आनंदून गेल्याचे मोहिते यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)व्यावसायिक प्रशिक्षणगेल्या तीन वर्षांपासून शाळेतील ४२ गतिमंद मुलांना गणपतीकरिता ‘उंदीर’, रक्षाबंधनाकरिता ‘राख्या’ , मेणाची जास्वंदीची फुले असे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत होते. यातून प्रशिक्षित झालेल्या मुलांनी यंदा शाडूच्या मातीचे पाच हजार उंदीर तयार करुन पेणमधील गणेशमूर्तिकारांना विक्री केले तर रक्षाबंधनाकरिता १४ हजार राख्या तयार करुन पेण परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना विक्री केल्या. आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे मिळतात असा आत्मविश्वास या मुलांना यंदा गवसल्याचे मोहिते यांनी सांगितले.