शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सृजन प्राथमिक शाळेत अनोखा मातृदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 03:14 IST

श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या! याच दिवशी मातृदिन असतो.

- जयंत धुळप अलिबाग : श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या! याच दिवशी मातृदिन असतो. मुलांचं संगोपन आणि संस्कार नेहमीच आई करत असते. आपले अवघे आयुष्य मुलांच्या सौख्यासाठी वेचणाऱ्या आईप्रति कृतज्ञता म्हणून मातृदिन साजरा केला जातो. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व शालेय जीवनातच बालगोपाळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याकरिता एका आगळ््या मातृदिनाचे आयोजन शनिवारी सृजन पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयात करण्यात आले होते.बालगोपाळ विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून रंगवलेली शुभेच्छापत्रे आपल्या आईचे शाळेत पूजन करुन तिला भेट म्हणून दिले आणि त्या माउलींना आपल्याच पाल्याचे कौतुक करण्याकरिता शब्दच अपुरे पडले होते. शाळेच्या प्रयोगशील मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या कल्पकतेतून शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाने आयोजित केलेल्या या अनोख्या मातृदिनास विद्यार्थ्यांच्या माता मोठ्या संख्येने आणि आगळ््या उत्साहात उपस्थित राहिल्या होत्या.या शाळेत बहुभाषिक विद्यार्थी असल्याने देशातील विविध राज्यातील माता यानिमित्ताने शाळेत एकत्र आल्या होत्या. त्याच्यातही या अनोख्या उपक्रमाच्या निमित्ताने संवाद झाला. आपापल्या आईला शुभेच्छापत्र दिल्यावर तिच्या चेहºयावरील आनंद पहाताना हे सारे चिमुकले देखील सुखावून गेले होते. आई आणि मुलगा वा मुलगी यांच्यातील अनोखा स्नेहभाव पहाताना शाळेचा शिक्षकवृंद देखील आनंदित होवून गेला होता.आपल्या आईला शुभेच्छापत्रात काय आवडेल याचा विचार करुन या बालगोपाळांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रातून बालभावनांच्या विविध कल्पनाविष्कारांचे दर्शन या निमित्ताने घडून आले.