शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अन्नधान्य आणि विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे लाभार्थ्यांना मार्गदर्शन, लाभार्थ्यांशी साधला संवाद

By राजेश भोस्तेकर | Updated: August 23, 2022 15:24 IST

Raigad News: अलिबाग जिल्ह्यातील  महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री.  भारत प्रल्हाद सिंह पटेल यांचा आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दौरा सुरू झाला आहे.

- राजेश भोस्तेकरअलिबाग -  जिल्ह्यातील  महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री.  भारत प्रल्हाद सिंह पटेल यांचा आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दौरा सुरू झाला आहे. किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जगदीश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाड येथील राष्ट्रीय स्मारक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.  

रायगड लोकसभा प्रवास योजना  या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान विमा योजना इत्यादी अनेक योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बंधू भगिनी, व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी, काही तक्रार असल्यास त्याबद्दल काही शंका असल्यास त्याचे निवारण मंत्री महोदय यांच्यामार्फत करण्यात आले. तसेच त्यांनी या योजना राबविण्यात काही त्रुटी असल्यास त्याबद्दल लाभार्थ्यांना विचारणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते शेवटच्या टोकाला आलेल्या नागरिकाला लाभ मिळाला पाहिजे. कोणतीही योजना राबविताना एखाद्या लाभार्थ्यांचे कागदपत्र घेतले असतील तर दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेताना त्या लाभार्थ्याला  पुन्हा पुन्हा तेच कागदपत्रे मागितली जात आहेत, ते थांबले पाहिजे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजना यशस्वीरित्या राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील नागरिकांच्या दारोदारी वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळेल याची व्यवस्था करून ती त्या गावातील अत्यंत गरजू व्यक्तीला किंवा कुटुंबाला त्या त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य केले पाहिजे. अशा सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तुमच्या अडचणी वेळोवेळी संबंधित समन्वयकाकडे दिल्यास, त्यामुळे यंत्रणा योग्यरीतीने कार्यान्वित करता येईल.असे यावेळी केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले. त्यानंतर जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Raigadरायगड