शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावर गाइडची व्यवस्था पूर्ववत; पर्यटक समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 22:34 IST

प्रवासी संघटना आक्रमक झाल्याने घेतला निर्णय

आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून सुमारे साडेपाच लाख पर्यटक येथे येत असतात. चार ही बाजूला समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने येथे कधी ही पाणीटंचाई भासत नाही. या किल्ल्याचे पर्यटकांना खूप आकर्षण असल्याने येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या किल्ल्यावरील काही दिवसांपासून गाइेड व्यवस्था बंद करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना किल्याविषयी माहिती मिळत नव्हती. याबाबत प्रवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने पुन्हा गाइडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त के ले आहे.

गाइड बंद केल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणे बंद झाले होते, त्यामुळे पुरातत्व विभागाबद्दल स्थानिक नागरिकांचासुद्धा रोष वाढला होता. जंजिरा किल्ल्यावरील गाइेड व्यवस्था बंद केल्याचे समजताच मुरुड तालुका प्रवासी संघटना आक्रमक होऊन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी काही नागरिकांसह थेट जंजिरा किल्ला गाठून याबाबत किल्ल्यावर असणारे परिचारक प्रकाश गोगरे यांना विचारणा केली. गाइड व्यवस्था बंद केल्याने स्थानिक नागरिकांचा रोजगार बुडाला आहे, तरी पुन्हा गाइड पर्यटकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्याच वेळी येथे असणाऱ्या पर्यटकांनीसुद्धा आम्हाला गाइड आवश्यक असल्याची मागणी उचलून धरली. ज्याला आवश्यक वाटेल, तो गाइडचा उपयोग करेल, परंतु आम्हाला किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यावयाचा असतानासुद्धा गाइड नसल्याने आमचा हिरमोड होत असल्याची प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी गोगरे यांच्याकडे व्यक्त केली. यावर गोगरे यांनी येथे असणारे गाइड पर्यटकांकडून मोठी रक्कम आकारात होते, याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही गाइड व्यवस्था बंद करण्यात आली होती, परंतु पर्यटक व प्रवाशी संघटनेने मागणी केली, म्हणून आम्ही ही व्यवस्था पूर्ववत करीत आहोत, असे सांगितले. गाइडबाबत तक्रार पुन्हा होता कामा नये, अशी अपेक्षा यावेळी त्यानेही व्यक्त केली.यावेळी मुंबई येथील प्रफुल दवे आणि पुण्यातील आनंद करवा व इतर पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले असता जंजिरा किल्ल्यात गाइड सेवा चांगल्या प्रमाणे सेवा देत आहेत, परंतु ती सेवा मराठीत असावी जेणेकरून ती माहिती येथील येणाºया पर्यटकांना कळेल, तसेच गाइड सेवकांनी या किल्लाचा संपूर्ण इतिहास सांगितला पाहिजे, अशी अपेक्षा पर्यटकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.