शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग शुन्य किमीवर अनधिकृत प्रवासी वाहतूक

By वैभव गायकर | Updated: September 6, 2023 16:48 IST

सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली याठिकाणाहून द्रुतगती महामार्गाला सुरुवात होते. पुणे तसेच पुढे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांची याठिकाणी मोठी गर्दी असते.

पनवेल:मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची ज्या ठिकाणाहून सुरुवात होते.अशा कळंबोली येथील शुन्य किमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.बंदी असताना प्रवासी याठिकाणी उभे राहत असल्याने जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कळंबोली वाहतुक पोलिसांची देखील चांगलीच दमछाक होत आहे.

सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली याठिकाणाहून द्रुतगती महामार्गाला सुरुवात होते. पुणे तसेच पुढे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांची याठिकाणी मोठी गर्दी असते. द्रुतगती महामार्गावरून प्रवास करण्यापूर्वी प्रवासी गाड्या कळंबोली याठिकाणी द्रुतगती महामार्गाच्या अलीकडे थांबत असतात.कळंबोली मॅकडोनाल्ड स्टॉप हे याकरिता अधिकृत थांबा नेमला असताना पुढे काही प्रवासी शून्य किमीवर थांबत असतात.हे प्रवासी पाहुन काही वाहन चालक आपल्या गाड्या थेट नो पार्किंग मध्येच म्हणजे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशिकेवर उभ्या करतात.बंदी असताना अनेक वाहने याठिकाणी थांबत असल्याने जोरदार वेगाने  येणाऱ्या इतर वाहनांना या वाहनांचा अडथळा निर्माण होतो.अनेक वेळा किरकोळ अपघात देखील याठिकाणी घडत असताना प्रवासी सर्रास याच जागेवर उभे राहत आहेत.भविष्यात याठिकाणी अपघाताची मोठी घटना घडू नये म्हणुन वाहतुक पोलिसांनी याकरिता मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे

दंड वसुल करणार कोण?बंदी असलेल्या याठिकाणावर गाडी उभी करणे तसेच प्रवासी थांबल्यास 5 हजारांचा दंड वसूल करण्यात येईल अशा स्वरुपाचा फलक याठिकाणी वाहतुक पोलिसांच्या नावाने कित्येक वर्षापासून लावण्यात आला आहे.मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसुन येत नाही.हा दंड वसूल कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याठिकाणी थांबणाऱ्या वाहन चालकांवर आम्ही दररोज दंडात्मक कारवाई करीत आहोत.याकरिता दोन कर्मचारी देखील आम्ही  नेमलेले आहेत.प्रवाशांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतुक पोलिसांना नाही.प्रवाशांनी याठिकाणावर थांबू नये असे अवाहन आम्ही वेळोवेळी करीत असतो.-हरिभाऊ बानकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खारघर वाहतुक शाखा )

टॅग्स :panvelपनवेल