शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील जनतेसोबत साधणार संवाद 

By निखिल म्हात्रे | Updated: January 27, 2024 16:51 IST

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

निखिल म्हात्रे, अलिबाग : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उध्दव ठाकरे हे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत जनातेसोबत संवाद साधणार आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. या दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली असून, प्रमुख पदाधिकारी विभागवार बैठका आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शनिवारी (दि.२७) अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या दौऱ्यात उध्दव ठाकरे हे १ फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग, रोहा येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. तर २ फेब्रुवारी रोजी म्हसळा, माणगाव, महाड येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. उध्दव ठाकरे दौऱ्यात जनतेसोबत संवाद साधणार आहेत. यामुळे या दौऱ्याची जनतेत उत्सुकता आहे. शिवसैनिकांमध्ये उत्स्थाह पसरला आहे. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विभागवार बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या दौऱ्यात उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते सुभाष देसाई सहभागी होणार असल्याची माहिती, सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार सतीश पाटील, उपजिल्हा संघटक अजित पाटील, अलिबाग मुरुड संघटक कृष्णा कडवे, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, महिला आघाडी अलिबाग संघटिका स्नेहल देवळेकर, राखी खरवले, संदिप पालकर, राखी खरवले यांच्यासह अलिबाग तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेalibaugअलिबाग