शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करंजा धक्क्या‌‌वर पार्क केलेल्या दुचाकी फेकल्या समुद्रात; समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:05 IST

Uran : रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करून उरण येथे येणारे प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

उरण : करंजा येथील बंदरात कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवासी, कामगारांच्या पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकी काही समाजकंटकांकडून थेट समुद्रात टाकून देण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी उरण पोलिसांकडे करण्यात आली आहे.रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करून उरण येथे येणारे प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उरण येथून अलिबाग येथे जाणारे आणि अलिबाग परिसरातून उरण येथे कामानिमित्ताने येणारे प्रवासी, कामगार वेळ, पैसे वाचविण्यासाठी दुचाकी घेऊन येत असतात. याआधी बंदरावर पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकींतून पेट्रोलची चोरी करणे, नासधूस करणे आदी प्रकार सातत्याने घडत होते. परंतु आता येथे पार्क करून ठेवलेल्या दुचाकी काही समाजकंटकांकडून थेट बंदरातील समुद्रात टाकून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तीन दिवसांपूर्वी उरण पंचायत समितीचे कर्मचारी तेजस म्हात्रे यांची गाडी समुद्रात टाकण्यात आली होती. समुद्राच्या ओहोटीमुळे दुचाकी प्रवाशांच्या नजरेस पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशा कृत्यांमुळे प्रवासी, कामगारांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड