- जयंत धुळप, अलिबागजिल्ह्यातील तब्बल १२ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीवर अनिश्चिततेचे वास्तव सांगणारे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शुक्रवारी एका दिवसात जिल्ह्यातील महाविद्यालयांतील २ हजार ५०० अर्ज आॅनलाइन दाखल झाले असल्याची माहिती रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी दिली आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे फी मान्यतेचे काम रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडून १ फेब्रु.ला पूर्ण झाले . मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संगणकीय आॅनलाइन प्रणालीद्वारे रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडे हस्तांतरित केले नाहीत. जिल्ह्यात २६ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीकरिता नोंदणी होवून सर्व संबंधित महाविद्यालयांना १ फेब्रुवारीला पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाइन प्रणालीद्वारे समाजकल्याण कार्यालयास पाठविण्यास सांगितले होते. मात्र बुधवारपर्यंत या २६ हजारपैकी ५० टक्केच म्हणजे १३ हजार विद्यार्थ्यांचेच अर्ज आले. लोकमतच्या वृत्तानंतर पुढील टप्प्यातील अर्ज आल्याने प्रलंबित अर्जांची संख्या आता १० हजारवर आली. या १० हजार प्रलंबित अर्जांपैकी ६ हजार ७११ विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचे खैरनार म्हणाले.इंटरनेट बंदमुळे विलंब१ फेबु्रवारीला महाविद्यालयांकरिता आॅनलाइन अर्ज दाखल प्रणाली समाजकल्याण विभागाकडून कार्यान्वित झाल्यानंतर प्रारंभी काही दिवस ती वेगाने चालत नव्हती, तर नंतर जिल्ह्यात बीएसएनएलची इंटरनेट सेवा सातत्याने बंद पडत असल्याने आॅनलाइन अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून विलंब झाल्याचे उपस्थित प्राचार्य व महाविद्यालय प्रतिनिधी यांनी बैठकीत सांगितले. अंतिम चित्र शेवटच्या दिवशी २९ फेब्रुवारी स्पष्ट होणार आहे.
दोन हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल
By admin | Updated: February 27, 2016 00:41 IST