शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन हजार नागरिकांना विंचूचा चावा

By निखिल म्हात्रे | Updated: February 4, 2024 18:02 IST

रायगड जिल्ह्यात सर्प दंश तसेच विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात सर्प दंश तसेच विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे. मागील 14 महिन्यात जिल्ह्यात 393 जणांना सर्प तर सुमारे दोन हजार जणांना विंचूदंश झाला असून, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन सर्प व विंचू दंश झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचविले असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते. सध्याच्या मौसमात साप व विंचू बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळावधीत सर्प व विंचू दंशाचे प्रमाण वाढते. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 महिन्यात जिल्ह्यात 393 जणांना सर्प तर सुमारे दोन हजार जणांना विंचूदंश झाला आहे. यामध्ये सर्पदंशाने पाच जणांना तर विंचू एकाला प्राण गमवावे लागले आहेत. सर्प व विंचूदंशाचे सर्वाधिक प्रमाण अलिबाग तालुक्यात आहे. पनवेल, खालापूर, महाड, माणगाव या तालुक्यांमध्येही सर्प व विंचूदंशाचे प्रमाण जास्त आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अ‍ॅन्टी स्नेक व्हॅक्सीन, तर अ‍ॅन्टी स्कोर्पियन व्हॅक्सीन मुबलक प्रमाणात ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात या औषधांचा साठा अधिक आहे. रुग्णालयांना औषधांची अतिरिक्त गरज भासली तर तत्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अंबादास देवमाने यांनी दिली.

सर्प वा विंचू दंश झाल्यावर तत्काळ सरकारी रुग्णालयात रुग्णास आणल्यास त्यावर त्वरीत योग्य ते उपचार होत असल्याने या दोन्हीतील मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प असल्याचे मागील 14 महिन्यातील आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतु आजही ग्रामीण भागात सर्प वा विंचू दंश झाल्यावर त्याचे विष उतरवण्याकरीता मांत्रिक वा भगताकडे रुग्णास नेले जाते. व नंतर रुग्णालयात आणले जाते. यामुळे काही वेळेस रुग्णाचा मृत्यू होतो. सर्प दंश वा विंचू दंश झाल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात रुग्णास दाखल करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.

सर्पदंश आणि विंचूदंशचे प्रमाण मोठे असले तरी त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय, माणगांव, पेण, कजर्त, रोहा व श्रीवर्धन अशी पाच उप जिल्हा रुग्णालये तर उरण, महाड, जसवली, मुरुड, पोलादपूर, पनवेल, चौक आणि कशेळे ही आठ ग्रामीण रुग्णालये अशा जिल्ह्यातील 14 ठिकाणी सर्पदंश आणि विंचूदंशावर तत्काळ उपचार उपलब्ध होत असल्याने सर्पदंश आणि विंचूदंशाच्या मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे. सापांचा वावर रात्री जास्त असतो, त्यामुळे अंधारात चालताना बॅटरी सोबत असावी, साप आपल्या समोर आल्यास न घाबरता स्तब्ध उभे राहावे, सापाचे लक्ष विचलित करण्यासाठी जवळची एखादी वस्तू बाजूला फेकल्यास त्या वस्तूकडे सापाचे लक्ष जाताच तुम्ही बाजूला व्हावे. तसेच साप चावल्यास मांत्रिक व भगताकडे न जाता रुग्णालयात जाऊन उपचार करावेत. - संदिप ठाकूर, प्राणीमित्र.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग