शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसमधील बॉम्ब प्रकरणी दोन हजार जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 03:35 IST

तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच नाही : माहितीच्या आधारे आरोपीचे काढले जातेय छायाचित्र

अलिबाग : कर्जत-आपटा या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याच्या घटनेला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही तपास यंत्रणेच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे दोन हजार प्रवाशांची चौकशी केली आहे. प्रवाशांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे छायाचित्र काढले जात आहे.

२० फेब्रुवारी २०१९ रोजी कर्जत-आपटा ही एसटी बस आपटा स्थानकात वस्तीला आली होती. त्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याने चांगलीच खळबळ माजून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यामध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. सुरुवातीला अलिबाग-कर्जत यादरम्यान सदरची बस धावली होती. त्यानंतर तिचे वेळापत्रक बदलले आणि तीच बस कर्जतहून आपटा येथे गेली होती.

आपटा येथे एसटी बस २० फेब्रुवारी रोजी रात्री वस्तीसाठी थांबल्यानंतर वाहकाने केलेल्या तपासणीदरम्यान त्यात पांढऱ्या रंगाची पिशवी आढळली. पिशवीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने त्यांनी त्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. रसायनी पोलिसांनी तपासणी करून अलिबागमधून बॉम्बनाशक पथकाला पाचारण केले होते.

रायगडमध्ये पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाने सार्वजनिक वाहने, खासगी वाहने तसेच गर्दीच्या ठिकाणी कसून तपासणी सुरू केली. बसने जास्त पल्ल्याचा प्रवास केला होता, त्यामुळे बस ज्या- ज्या परिसरातून गेली तेथील तब्बल दोन हजार प्रवाशांना पोलीस चौकशीला बोलवत होते. प्रवाशांना प्रवासादरम्यान काही संशयित आढळले का याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीचे छायाचित्र काढण्यात येत आहे.

कर्जत आपटा भागात पोलिसांचा तपास सुरूचबॉम्ब आढळल्याच्या घटनेला आता सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. या घटनेत बसमध्ये बॉम्ब आला कुठून याचा कसून तपास रायगड पोलीस करीत आहेत, तसेच संशयित आढळणाºया सर्वांची खोलवर चौकशी करण्यात येत आहे. तर त्या वेळेस घटनास्थळाच्या परिसरातून प्रवास करणाºया तसेच त्या दिवशी घटना परिसरात फोन केलेल्या नागरिकांचा जबाब घेऊन या घटनेसंदर्भात काही माहिती मिळतेय का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Bombsस्फोटके