शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात दोन टँकरला अपघात; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 05:40 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टँकर उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी खेड व पोलादपूर हद्दीत घडली.

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टँकर उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी खेड व पोलादपूर हद्दीत घडली. या अपघातात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले. खेड हद्दीत रसायनाचा टँकर उलटला. मात्र, कशेडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.टँकरचालक शिवकुमार केसालाल प्रसाद सादू (रा. मध्य प्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन लोटे ते न्हावाशेवा असा कशेडी घाटातून सायं. ६.१५ वाजताच्या सुमारास जात असता येलंगेवाडी जवळ एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.दुसरा अपघात खेड हद्दीत झाला. चालक पंकजकुमार केवळजी (रा. राजस्थान) हे टँकर घेऊन गुजरात ते लोटे असा जात होता. कशेडी गाव हद्दीत कशेडी आंबा येथे उतारावर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याला कळभणी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर टँकरमधील रसायनाची गळती होऊन रस्त्यावर वाहून गेले. या अपघाताची माहिती समजताच कशेडी पोलीस टॅपचे सहा. फौजदार मधुकर गमरे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. खेड येथील अग्निशमन बंब पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. कशेडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेची माहिती समजताच खेडचे पोलीस निरीक्षकांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.