शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा बंदरात तटरक्षक दलातर्फे दोन महाकाय बोटी दाखल, अतिजलद पेट्रोलिंग होणार शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:36 IST

रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत.

आगरदांडा : रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ५० मीटर बाय ७ मीटर लांबीच्या या अत्याधुनिक जहाजांमुळे अतिजलद पेट्रोलिंग शक्य होणार असून रायगडच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ वा तुफानी वाऱ्यापासून खोल समुद्रात मच्छीमारांना उद्भवणाऱ्या संकटाचा मुकाबला करणे व मदतीचा हात देणे शक्य होणार आहे.मुंबई येथे १९९३ साली बॉम्बस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले. तद्नंतर तटरक्षक दलाची ठिकठिकाणी टेहळणी केंद्र निर्माण होऊन अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सागरी सुरक्षा दल सोबत भारतीय तटरक्षक दलाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आगरदांडा येथे भारतीय तटरक्षक दलाचे टेहळणी केंद्र तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला टेहळणी करण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांचे साह्य घेऊन टेहळणी करण्यात येत होती. परंतु आता स्वतंत्र मोठ्या बोटी आल्याने आगरदांडा टेहळणी केंद्राला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अतिरेकी कारवायांवर नजर ठेवता ठेवता स्थानिक मच्छीमार हे समुद्रात संकटात सापडल्यावर या महाकाय बोटींचे मोठे सहाय्य्य प्राप्त होणार आहे.अमली पदार्थांची तस्करी रोखणे, अतिरेक्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे तसेच समुद्रात उदभवणाऱ्या अस्मानी, सुलतानी संकटाप्रसंगी बचाव कार्यात नेहमीच तटरक्षक दल कार्यरत असते. दोन बोटींमुळे पेट्रोलिंग खूप लांबवर होऊन खोल समुद्रात होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर पायबंद ठेवता येणार आहे. 

टॅग्स :Raigadरायगड