शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर मीनल दळवी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी, घरात सापडले ६० तोळे सोने

By राजेश भोस्तेकर | Updated: November 12, 2022 15:34 IST

महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली.

अलिबाग : अलिबाग तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दळवी आणि चव्हाण याना आज शनिवारी न्यायाधीश अशोककुमार भिलारे याच्या न्यायलायात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोघानाही सोमवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचखोर मीनल दळवी यांच्या विक्रोळी येथील घरातून एक कोटी रोकड हस्तगत केली आहे. नवी मुंबई लाचलुचपतच्या कस्टडीत त्यांना ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍड भूषण साळवी तर आरोपी पक्षातर्फे ऍड प्रवीण ठाकूर आणि ऍड अंकुश मोरे यांनी काम पाहिले. 

फिर्यादी याच्या सासऱ्याना मिळालेल्या बक्षीस पात्र जमिनीवर नाव चढविण्यासाठी आणि सासऱ्याच्या भावाने बक्षीस पत्रावर घेतलेल्या हरकतीचा अपील प्रकरणात निकाल सासऱ्याच्या बाजूंना द्यावा यासाठी तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखाची लाच मागितली होती. याबाबत फिर्यादी यांनी २८ सप्टेंबर रोजी नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. २९ सप्टेंबर रोजी पथकाने याबाबत सत्यता पडताळून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. 

महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. तर दळवी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे चव्हाण याने सगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. 

शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दळवी आणि चव्हाण यांना जिल्हा न्यायलायत हजर केले. न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून लाचखोर अधिकारी मीनल दळवी, एजंट राकेश चव्हाण याना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महसूल विभागात भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दळवींकडे साठ तोळे सोने

मीनल दळवी याची दीड वर्षभरापूर्वी अलिबाग तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. दळवी याना लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाच लुचपत पथकाने अटक आहे. त्याच्या अलिबाग येथील घरची तपासणी केली असता साठ तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली आहे. तर मुंबई विक्रोळी याठिकाणीही दळवी यांची मालमत्ता असून तेथील घरातून एक कोटी रोकड हस्तगत केली आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग