शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये फणसाड अभयारण्यात आढळले दोन बिबटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:36 IST

या प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती.

- संजय करडे 

मुरुड : बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेच्या वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने येथे बिबट्याचे अस्तित्व असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. फणसाड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक बी.बी.बांगर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

या प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती. १४ ट्रॅप कॅमेरे व लागणारे तज्ज्ञ व्यक्ती सुद्धा यासाठी नियुक्त करून ही प्रगणना पूर्ण करण्यात आली. जेथे पिण्याच्या पाण्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची मचाण बनवण्यात येऊन फणसाडच्या कर्मचारी वृंदांनी रात्रभर जागता पहारा देऊन ही मोजदाद पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या अभयारण्यातील बिबटे गायब झाले आहेत अशी शंका येथील नागरिकांना होती, परंतु या प्रगणनेच्या वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने जंगलाच्या अतिदाट भागात त्यांचे वास्तव्य असल्याचे दिसून येते.

संख्या वाढण्याची शक्यताच्या प्रगणनेबाबत अधिक माहिती देताना फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण म्हणाले की, या संपन्न झालेली वन्यजीव मोजदाद ही त्या दिवशी जेवढे वन्यजीव दिसले त्याप्रमाणे ही नोंद करण्यात आली आहे. याचा अर्थ कोणीही असा समजू नये या अभयारण्यात एवढेच प्राणी आहेत. यापेक्षा जास्त वन्यजीव येथे अस्तित्वात असून या जंगलात त्यांचे व्यवस्थित संगोपन होत आहे. प्रगणनेसाठी कर्मचारी वृंद व निसर्गप्रेमी संघटना यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

सांबर ७भेकर १रानडुक्कर ९शेकरू ९ससा १रानगवे २रानमांजर १फ्रॉग माऊथ ३साळींदर १मुंगूस ३माकडे ३३वानर ३१रानकोंबडे ११मोर ६गिधाड ०ब्राहमी घार ३