शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांच्या शर्विकाने केला कलावंतिणीचा सुळका सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 05:19 IST

कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताकदिनी अर्ध्या तासात चढून सर केला. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली.

निखिल म्हात्रे अलिबाग : लोणारे गावातील अडीच वर्षाच्या चिमुरडीची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. शर्विका म्हात्रे असे तिचे नाव असून कर्जत माथेरानमधील किल्ले प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताकदिनी अर्ध्या तासात चढून सर केला. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली. यापूर्वी शिर्विका हिने अकरा किल्ले सर केले आहेत.कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला असून तो चढण्यासाठी साधारण तीन तासांचा अवधी लागतो. तेथून कलावंतीणीचा सुळका चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि आभाळाला भिडणारा सुळका सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. शार्विकाने या सुळक्यावर आरोहण करून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावित समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. शर्विकाने गड सर करताना शिवरायांवर अधारीत ओव्या, पोवाडे, भुपाळ्या म्हणत कलावंतीणीचा सुळका सर केला.भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून तिने महाराष्ट्राचे नाव देशात सुवर्णाक्षरांनी कोरले असल्याने तिच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.>११ किल्ले सरशर्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे तिने सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरु ड-जंजिरा,पद्मदुर्ग, उंदेरी, कलावंतीणीचा दुर्ग असे ११ किल्लेव गड सर केले आहेत. शर्विकाच्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.