मोहोपाडा : मुंबई-पुणे महामार्गावरील बारवई गावात एकाच रात्री आसपासच्या घरांच्या बाहेरून कड्या लावून तीन ठिकाणी चोरी केल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. बारवई गावातील गणेश पाटील यांची पत्नी तन्वी पाटील या कर्जत येथे माहेरी गेल्या होत्या तर गणेश पाटील हे वारकरी असल्याने भोकरपाडा येथे रविवारी रात्री सप्ताहाला गेले होते. रविवारी २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बारवई गावातील घराबाहेरील कड्या लावून गणेश पाटील यांच्या घराचे बाहेरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटाचे लॉक उचकटवून कपाटातील कपडे व सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटातील सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याची कानसाखळी व चांदीचा कंबरपट्टा साखळी असा एकूण चाळीस हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी कृष्णा अर्जुन पाटील यांच्या घरातीलही बाहेरील कुलूप तोडले, परंतु घर खाली असल्याने चोरट्यांचा डाव फसला. तर सुरेश भाऊ बाबरे यांच्या दुकानातील दरवाजाचे लॉक तोडून अंदाजे पाच हजार रकमेची चोरी केली. याबाबत पोलिसांत तक्र ार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.(वार्ताहर)
बारवईत तीन घरफोड्या
By admin | Updated: January 31, 2017 03:35 IST