शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक १५० फूट दरीत कोसळला; आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती

By कुणाल गवाणकर | Updated: January 8, 2021 21:33 IST

चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रकला अपघात; घटनास्थळी मदतकार्य सुरू

रायगड: वऱ्हाडाचा ट्रक १५० फूट दरीत कोसळल्याची घटना रायगडमधील कुडपान गावाजवळ घडली आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक दरीत कोसळला. पोलादपूरहून लग्न सोहळा उरकून वऱ्हाडी मंडळी ट्रकमधून निघाली होती. हा ट्रक पूर्णपणे भरलेला होता. सध्या घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीनं मदतकार्य सुरू असून आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर ६५ जण जखमी झाले आहेत.पोलादपूरमधील लग्न सोहळा उरकून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकला कुडपान गावाजवळ अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक १५० फूट दरीत कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक पोलीसदेखील दुर्घटनास्थळी पोहोचले. पोलादपूर पोलीस आणि ट्रेकर्सदेखील मदतीसाठी पोहोचत आहेत. अंधार पडल्यानं मदतकार्यात अडचणी येत आहेत. दरीत कोसळलेल्या ट्रकमध्ये असलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. 'खेडच्या तहसीलदारांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. आसपास असलेल्या रक्तपेढ्यांशी आणि रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मदतकार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,' असं चौधरी यांनी सांगितलं.

टॅग्स :Accidentअपघात