शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दीपोत्सवातून सिद्धगडावर हुतात्म्यांना श्रद्धांजली, तरुणांचा मोठा सहभाग; पाचशेहून अधिक पणत्या लावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:16 IST

सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली.

कांता हाबळे नेरळ : सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. दिवाळीत या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत असून, गुरु वारी रात्री १२ वाजता पाचशेहून अधिक पणत्या प्रज्वलित करून वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाºया वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिविरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या उद्देशाने गतवर्षी पोशीर येथील धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सुरु वात करण्यात आली आहे.कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरुणांनी रात्री १२ वाजता सिद्धगडावरील हुतात्मा ज्योतीस्थळावर सुमारे ५०० पणत्या लावल्याने संपूर्ण परिसर रोषणाईने उजळला होता.शहिदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता मोठ्या संख्येने तरुण या वेळी उपस्थित होते. या वेळी क्र ांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, यांनी हुतात्म्यांविषयी इतिहास सांगत कृतज्ञता व्यक्त केली.या वेळी मानिवली ग्रामपंचायत सदस्य प्रशांत झांजे, परेश भगत, नितीन झांजे, धनेश राणे, हरेश गायकर, किशोर गायकर, मयूर गायकर, अनंता गवळी, किशोर गवळी, रूपेश हाबळे, विकास हाबळे, रघुनाथ हाबळे, राजेश हाबळे, धनेश राणे, अमोल गायकर, आदी उपस्थित होते.>रेल्वेस्थानकाला हुतात्म्यांचे नाव द्या!क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत यांनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत कर्जत रेल्वेस्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल आणि नेरळ रेल्वेस्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्याचा संकल्प या वेळी केला.अनेक तरु ण यासाठी पुढाकार घेणार असून, कर्जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. व याचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड