शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:17 IST

आदिवासीवाडीसाठी वनविभाग आडकाठी करत असल्यामुळे अनेक वर्षे रस्ता नसून, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली.

वावोशी : आदिवासीवाडीसाठी वनविभाग आडकाठी करत असल्यामुळे अनेक वर्षे रस्ता नसून, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. त्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी अशा गोष्टीसाठी डोळे बंद करा व रस्ता होऊ द्या, अशा सूचना आमदार मनोहर भोईर यांनी दिल्या. खालापूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी दुपारी १२ वाजता आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नऊ गावांतील येऊ घातलेल्या ‘नैना’ प्रकल्पाचीही चर्चा करण्यात आली. लवकरच सिडको प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन या वेळी आमदार भोईर यांनी दिले. पाणीप्रश्नावरही आमसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.अ‍ॅडलॅब इमॅजिका वॉटरपार्कला कलोते धरणातून पाणीपुरवठा करण्यात येऊ नये, अशी भूमिका घोडवलीचे सरपंच शिवाजी पिंगळे यांनी मांडली. या वेळी अ‍ॅडलॅबची बाजू मांडणाºया राष्ट्रवादी पदाधिकाºयाला पिंगळे यांनी त्यांची वकील करू नका, असा सल्ला देत गप्प बसविले. पाताळगंगा नदीत अल्प पाणीसाठा शिल्लक राहत असताना खासगी प्रकल्पाकडून उपसा करण्यात येत असल्यामुळे भविष्यात खालापूरला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळे बेकायदा उपसा थांबवा, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांनी केली. वाणविली विहीरचोरी प्रकरणी अद्याप काहीच कारवाई झाली नसल्यामुळे तक्रारकर्ते मनोज थोरवे यांनी संताप व्यक्त करत दोषीवर कारवाईला प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप केला. सावरोली येथील बंद कोपरा कामगारांच्या निधनामुळे संसार उघड्यावर पडलेल्या महिलांनीदेखील आमसभेत कारखान्याकडून काहीच देणी न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याची व्यथा मांडली. आमदार मनोहर भोईर व आमदार सुरेश लाड यांनी याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावेळी आमदार मनोहर भोईर, कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे आदी उपस्थित होते.