शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी सजल्या बाजारपेठा, वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:28 IST

येथील बाजारपेठेत जवळपास ८३ गावांतील नागरिक खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हसळा बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणा-या वस्तू खरेदीसाठी, तसेच घरसजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे.

म्हसळा : येथील बाजारपेठेत जवळपास ८३ गावांतील नागरिक खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हसळा बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणा-या वस्तू खरेदीसाठी, तसेच घरसजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे.केंद्र शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या वस्तू सेवा कर म्हणजे जीएसटीमुळे अगरबत्तीपासून मखरासारख्या शोभेच्या वस्तूंचे दर वाढल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. गणपतीसाठी आरत्या, मंत्र तसेच रंगीबेरंगी बल्बचा झगमगाट नयनरम्य वाटतो. सोनेरी, चंदेरी लेप चढवून सजवलेल्या इलेक्ट्रिक पणत्या व दीपमाळा लक्ष वेधून घेत आहेत. देखाव्यात रंगीबेरंगी लुकलुकणाºया विजेच्या तोरणांपासून देखाव्याचे सामान, फुले, फळांनी बाजार बहरला आहे. गणेशोत्सवासाठी बाजारात मोगरा, चमेली, शेवंती, काकडा, गुलाब, लीली आदी फुलांनी हजेरी लावली आहे. सोनचाफा व केवडा या स्थानिक फुलांना या काळात मोठी मागणी असल्याने यांचा भाव वधारलेला असतो. गणपतीत सफरचंद, पपनस, पेर, केळी, मोसंबी या फळांना मागणी असल्यामुळे बाजार फळांनी सजला आहे.दोन दिवसांवर उत्सव आल्याने जवळपास सर्व गणेश मंडळातील कामे आटोपत आली तरी बारीकसारीक कलाकुसरीची कामे सुरू आहेत. नोटाबंदी व जीएसटीमुळे खिशाला झळ बसणार असली तरी गणरायाच्या चाहुलीने बाजारपेठांत नवचैतन्य आहे.