शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांना लाल दिव्याचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:23 IST

व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्यासाठी वाहनावर लाल दिव्याचा वापर करून वाहतूक पोलिसांना धाक दाखविणाऱ्या एका वाहनधारकावर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- वैभव गायकरपनवेल : व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्यासाठी वाहनावर लाल दिव्याचा वापर करून वाहतूक पोलिसांना धाक दाखविणाऱ्या एका वाहनधारकावर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल मनोहर बामणे (२७) असे या वाहनधारकाचे नाव आहे. त्याला अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.खारघर वाहतूक शाखेचे कर्मचारी मारु ती सानप व रवींद्र टकले हे शनिवारी हिरानंदानी उड्डाणपाखाली वाहतूक नियमन करीत असताना दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी उड्डाणपुलाखाली थांबली. ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी या गाडीच्या चालकाची चौकशी करून लायसन्सची विचारणा केली. त्यानुसार चालकाने लायसन्स दाखविले. परंतु वाहनाच्या कागदपत्राची तपासणी करताना वाहतूक पोलिसांना गाडीच्या डॅशबोर्डवर नारंगी रंगाचा अंबर दिवा आढळून आला. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी खारघर पोलिसांना याबाबत माहिती दिली. खारघर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता लातूरच्या गायकवाड नामक खासदारांचे पत्र सोबत बाळगून हा वाहन चालक लाल दिवा मिरवत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी खारघर पोलिसांनी वाहन चालक स्वप्निल मनोहर बामणे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी दिली. संबंधित वाहन चालकाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र लोकसेवक आमदार, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकाºयांच्या पदाचा वापर करीत वाहन चालक कशाप्रकारे बडेजाव मिरवत आहेत हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :panvelपनवेलtraffic policeवाहतूक पोलीस