शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ, सुरक्षेवर भर 

By निखिल म्हात्रे | Updated: December 25, 2023 18:39 IST

ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे.

अलिबाग : ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन केद्रांवर हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. या संधीचा फायदा घेऊन हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रायगड मधील अलिबाग, मुरुड, काशिद, किहीम, हरीहरेश्वर, माथेरान, कर्नाळा अभयारण्य अशा आदी ठिकाणी पर्यटक दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरुड परीसरात गेल्या चार दिवसात अडीच लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. दिवाळी सुटीपासूनच पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु सध्या थंडीचा मोसम आणि सलग सुटय़ा असल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झालेत. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आलेत. 

हॉटेल, लॉजिंगचा व्यवसायही तेजीत आहे. घोडागाडीवाले, विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट्स यांचा व्यवसाय करणारे खूश आहेत. इथल्या लॉजेसनाही चांगला व्यवसाय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे. किनारपट्टीबरोबरच रायगड किल्ला, महड, पाली येथील अष्टविनायकांची मंदिरे, साळाव येथील बिर्ला गणेश मंदिराचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. रायगडमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. आताच्या मोसमात पर्यटकांचा हा ओघ नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत असाच कायम राहणार आहे. नाताळच्या सुट्टीमुळे व पुढे चार दिवसांनी थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठीया ठिकाणांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हॉटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डिस्को, डिस्कोथेकची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. 

याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षीततेसाठी समुद्र किनाऱ्यांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर पोलिस मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. अतिउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. महत्वाच्या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच आपल्या अतिउत्साही जल्लोषाने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यात आजपासून साधारणत: 7 दिवस वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान पर्यटकांना वाहतूकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आली असून पोलिस यंत्रणेचा कटाक्ष असणार आहे. तर बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :alibaugअलिबागtourismपर्यटन