शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 06:22 IST

पर्यटकांची गर्दी : महामार्ग रुंदीकरणाचे काम संथ गतीने ; काम वेळेत न झाल्यास वाहतूक कोंडी वाढणार

पेण : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला असून दररोज लाखो वाहने मुंबई, ठाणे, कल्याणकडून कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर ये-जा करू लागली आहेत. रायगडातील लोकसभेची निवडणूक संपली असून सध्या पर्यटकांनी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीची मजा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पेण ते वडखळ मार्गावर बायपास पूल रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र हा रस्ता तयार न झाल्यामुळे जुन्या रस्त्यावरूनच वाहने ये -जा करीत आहेत. त्यातच रामवाडी येथील उड्डाणपुलाचे काम, उचेडे येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून सिंगल सर्व्हिस रोडवरून वाहनांची ये -जा सुरू असल्याने वडखळ ते पेण महामार्गावर दररोज वाहतूककोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.

नेहमीच्या वाहतूककोंडीत शनिवार, रविवारचा जर वार असेल तर अधिक भर पडत आहे. ज्यांना अधिकची सुट्टी मिळाली नाही ते वीकेण्डचा पर्याय म्हणून शनिवार, रविवार हे हक्काचे सुट्टीचे वार म्हणून अलिबाग, मुरुड-जंजिरा, किहीम बीच, नागाच बीच, काशिद बीच तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगर बीच, महाबळेश्वरकडे जाण्यासाठी एक दिवस निवासी किंवा त्याच दिवशी परत जावून येवून करण्यासाठी कुटुंबीयांसह स्वत:च्या गाडीने प्रवास करतात.

वडखळ -पेण महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने, जागोजागी पुलांची अर्धवट कामे, रस्ता रुंदीकरणाची अर्धवट कामे व रस्त्यातच खोदकामात माती दगड तसेच ठेवून ठिकठिकाणी वळणदार मार्ग तसेच ठेवल्याने सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो वाहनांना या वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत आहे. 

दररोज लागतात वाहनांच्या रांगापेण ते वडखळ हे ६ किमीचे अंतर असले तरी अजूनही या प्रवासाला २० ते २५ मिनिटे वेळ जात आहे. पेण रेल्वे स्टेशनपासून रामवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वे उड्डाण ब्रीजचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पुढे उचेडे येथे पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. या दोन्ही कामामुळे एकेरी सर्व्हिस मार्ग शिल्लक ठेवला आहे. या ठिकाणी दररोज वाहनांच्या रांगा लागत आहेत. पुढील महिन्यात अधिक वाहने या मार्गावरून जाणार असून हे काम पूर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होईल.

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी