शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएच्या खासगी जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम कोलमडल्याने परिसरातील आठ तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 22:06 IST

वाहतूक कोंडीमुळे रस्ते, उड्डाणपूलावर वाहनांच्या सात किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा !

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए अंतर्गत असलेल्या जीटीआय या एका खाजगी बंदराची इंट्रीगेट सिस्टीम बंद पडल्याने जेएनपीए परिसरातील रस्ते, उड्डाणपूलावर शुक्रवारी सकाळपासूनच परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे परिसरात सुमारे सहा-सात किमी पर्यंत कंटेनर ट्रेलरच्या रांगा लागल्या होत्या. 

जेएनपीए अंतर्गत पाच खासगी बंदरे आहेत.ही   पाचही बंदरे जेएनपीएने खासगीकरणातून चालविण्यासाठी दिली आहेत.शुक्रवारी (२३) जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम बंद पडली. कंटेनर तपासणीची यंत्रणाच कोलमडल्याने बंदरातील कंटेनर वाहतूक पुरती बंद पडली.यामुळे मात्र जेएनपीए परिसरातील सर्वच रस्त्यांवर कंटेनर ट्रेलर जागा मिळेल त्या ठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आले होते.या अवैध कंटेनर ट्रेलरच्या पार्किंगमुळे जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

द्रोणागिरी ते चांदणी चौक,करळ आदी उड्डाण पूलांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.परिसरातील सहा-सात किमी अंतरापर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. जेएनपीए अंतर्गत असलेल्या खासगी बंदरात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. शुक्रवारी खासगी जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम बंद पडली.यामुळे सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.वाहनाच्यांही ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या.मात्र संध्याकाळी पाच वाजता बंद पडलेली सिस्टीम पुर्ववत सुरू झाली.त्यानंतर वाहतूकही सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी