शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी पारंपरिक मूर्तिकार

By admin | Updated: September 14, 2015 04:07 IST

तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. पेण नगरीप्रमाणे रोहा शहर आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने सुरु राहात नाही

रोहा : तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. पेण नगरीप्रमाणे रोहा शहर आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने सुरु राहात नाही. केवळ काही महिन्यांपुरतीच मूर्तिकारी मर्यादित राहात असल्याने मूर्तिकारांना इतर वेळी नोकरी व कामासाठी गावाबाहेर जावे लागते. परिणामी मूर्तिकारांची दिवसेंदिवस घटणारी संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.रोहा शहरातील अष्टमी, दमखाडी, धनगर आळी आणि सोनार आळीत तसेच सोनगाव, उडदवणे, सानेगाव, यशवंतखार, महादेवखार, चांडगाव, चणेरा, बुरुमखान, वरसे कोलाड, किल्ला आदी तालुक्यातील गावांत आजही मूर्तिकार शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती घडविताना दिसून येतात. रोहा शहरात व तालुक्यात मिळून साधारण ७५ ते ८० मूर्तिकार व तेवढेच रंगकाम करणारे आहेत. लहान-मोठ्या मिळून साधारण दोन हजार मूर्ती दरवर्षी येथे घडविल्या जातात. यातील पाच ते दहा टक्के मूर्ती विक्री न होता शिल्लक राहात असल्याचे सांगण्यात आले. या व्यवसायातून तालुक्यात साधारण ३८ लाख रुपयांची उलाढाल होत असते.