शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

बालगोपाळांमध्ये इतिहास जागवणारी किल्ल्यांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 04:30 IST

- जयंत धुळप अलिबाग - दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची परंपरा प्राचीन आहे. नवी पिढी इतिहास विसरते आहे असा केला जाणारा ...

- जयंत धुळपअलिबाग - दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची परंपरा प्राचीन आहे. नवी पिढी इतिहास विसरते आहे असा केला जाणारा दावा या बालगोपाळांनी जोपासलेल्या दिवाळी किल्ले परंपरेने फोल ठरविला आहे. दिवाळीतील किल्ले बांधण्याकरिता बालगोपाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पराक्रम अनाहूतपणे जाणून घेत आहेत. हिंदवी स्वराज्य लढ्यातील मावळ््यांपासून आजच्या सैन्यातील सैनिकांपर्यंतच्या संरक्षण व्यवस्थेचे त्यांना आकलन होत असते. स्थापत्य शास्त्राचा प्राथमिक अभ्यास किल्ल्यांमुळे या बालगोपाळांचा लहान वयातच होतो हे नाकारता येणार नाही.राजस्थानची परंपरा महाराष्ट्रात रुजलीदिवाळीच्या शेवटच्या दिवशी राजांकडून फटाक्यांची आतषबाजी होत असे.त्यावेळी या किल्ल्याच्या प्रतिकृतींमध्ये फटाके लावून या प्रतिकृती उद्ध्वस्त केल्या जात असत. शत्रूचा हा मुलूख जिंकताना आपल्या सैन्याने दिलेला लढा राज्यातील प्रजेला कळावा असा उद्देश यामागे असायचा. राजस्थानात आजही हा प्रघात पाळला जातो. राजस्थानची ही परंपरा शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात रुजली.राजस्थानमध्ये जन्माला आली परंपरादिवाळीमध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा प्रारंभ सर्व प्रथम राजस्थानमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानचे असल्याने, कालांतराने ही स्फूर्तिदायी परंपरा महाराष्ट्रात आली आणि पक्की रु जली. शत्रूच्या ताब्यातून जिंकलेले मुलुख प्रत्येकाला पाहणे शक्य नसल्याने राजस्थानातील राजे दिवाळीपूर्वी त्या मुलुखातल्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करीत असत. त्याकाळी राजस्थानातील जनतेकरिता या किल्ल्याच्या प्रतिकृती पाहण्यास जाणे मोठ्या औत्सुक्याचे आणि तितकेच आनंददायी असे.शाळा, संस्थांमध्ये स्पर्धेचे आयोजनआजच्या पिढीला टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइल यांच्या मायाजालातून थोडेसे बाजूला काढून छत्रपती शिवरायांचा अनन्यसाधारण इतिहास लक्षात आणून द्यावा, छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेला लढा त्यांच्यासमोर यावा, ही त्यामागील अपेक्षा आहे. पुरातन स्थापत्यशास्त्राची माहिती मुलांना व्हावी या हेतूने कुरूळ गावातील सु.ए.सो. शाळा व सृजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या कल्पकतेतून शाळेच्या वतीने ‘दिवाळी किल्ला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडDiwaliदिवाळी