शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:26 IST

सौभाग्याच्या रक्षणासाठी गौरीपूजन; महालक्ष्मीच्या सोहळ्याचा अनोखा उत्साह

- जयंत धुळप अलिबाग : गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुड्याचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी दृढश्रद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमधील खारेपाटात विशेषत: वाशी, वढाव, भाल, पेण फणसडोंगरी, खारसपोली या भागात गौराई डोक्यावर नाचवण्याची परंपरा सुमारे १०० वर्षांपेक्षा जुनी असल्याची माहिती, ग्रामीण रूढी-परंपरांचे अभ्यासक पेण तालुक्याच्या खारेपाटातील वढाव येथील देवीदास म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.गौराई डोक्यावर घेऊन नाचवण्याची ही अनोखी पंरपरा आजही आबाधित आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी गौरींचे अर्थात खारेपाटात गौरार्ईचे स्वागत शनिवारी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. गौराईची कथा मोठी रोचक अशीच आहे. एकदा कौलासुर नावाच्या राक्षसांने स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्या स्त्रिया ब्रम्हा, विष्णू, महेशाकडे गेल्या. त्यांनी कौलासुराच्या त्रासाचा पाढाच वाचला. स्त्रिया महालक्ष्मीला शरण गेल्या. देवीने त्यांना धीर दिला. महालक्ष्मीने कौलासुराचा नाश केला, तेव्हापासून ‘गौर’ म्हणजेच महालक्ष्मीचा सोहळा गणेशोत्सवात साजरा केला जातो.माहेर आणि सासरला जोडून ठेवणारा हा गौराईचा सण नव्हे, तर संस्कार असल्याची धारणा खारेपाटात आहे. पारंपरिक गाणी गौरीच्या आगमनाच्या रात्री खारेपाटात घराघरांत घुमत असतात. खारेपाटातील भाल येथील सरोज अशोक म्हात्रे, वढाव येथील शकुंतला गजानन म्हात्रे, खारसपोलीमधील हरिश्चंद्र म्हात्रे, गौर फणस डोंगरी-पेण येथील रंजना राम म्हात्रे, वाशी येथील माहेरवाशीण संगीता पाटील या सर्व जणी एक ते दीड किलोमीटरचे अंतर पाटाला हात न लावता, भजनात नाचत गौर विसर्जनाकरिता घेऊन जातात.उरणसह तालुक्यात केवडा झाला दुर्मीळउरण : उरण परिसरातील समुद्रकिनारेच पार उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्यावर असलेली केवड्याची वनेही नष्ट झाली आहेत. गणपतीला केवडा अत्यंत प्रिय आहे. मात्र, आता हा मनमोहक सुगंध देणारा केवडा उरण परिसरात दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. उरण परिसरातील घारापुरी, केगाव-दांडा, पीरवाडी ते करंजा परिसरातील विविध सागरीकिनाºयांवर ठरावीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केवड्याची वने आढळून येतात.केवडा श्रावण, भाद्रपद महिन्यातच फुलतो, बहरतो. गणेशोत्सवात केवड्याला विशेष महत्त्व आहे. केवड्याला केतकी, ताझम फू , धुली पुष्पम, अशी इतर अनेक नावे आहेत. केवड्याच्या फुलांचा सुवासिक अत्तर आणि तेल बनविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. झाडांची मुळे, पाने, खोडापासून मॅट बनविण्यासाठी, औषधे बनविण्यासाठी वापर केला जातो. गणेशपूजनात केवड्याला विशेष महत्त्व असल्याने भक्तांकडून सध्या मोठी मागणी आहे.देशातील काही भागांत केवड्याच्या झाडांची लागवडही केली जाते. उरण परिसरात समुद्रकिनारपट्टीची दिवसेंदिवस प्रचंड धूप होत चालली आहे. केवड्याचे फूल गणेशाला वाहण्यासाठी भक्त उत्सुक असतात. याशिवाय केवड्याच्या पातीलाही विशेष मागणी असते. मात्र, केवड्याची वने नामशेष होत असल्याने केवडा दुर्मीळ झाला आहे.गौराईच्या आगमनाने उत्साह द्विगुणितपेण : ‘बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...’ श्री गणेशाच्या आगमनाने भाद्रपदातील हा आनंद सोहळ्यातील परमोच्च क्षण म्हणजे गौरीचे आगमन.रांगोळ्या, घराची सजावट, गौराईच्या मखराची आरास, तिला नटवणे, प्रसादाचे, गोडाधोडाचा नैवेद्य करून गौराईचे स्वागत केले जाते. गौराईच्या आगमनाने घरात वेगळाच उत्साह संचारतो.पूर्वी गौरीचे स्वागत पारंपरिक गाणी गाऊन केले जायचे. त्यानंतर झिम्मा फुगड्या, उखाणे, पारंपरिक खेळ खेळले जायचे. मात्र, काळानुरूप गाणी बदलली असली, तरी गौराईच्या आगमनाचा उत्साह आजही कायम आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRaigadरायगड