शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची पावले वळली माथेरानकडे; स्टॉलधारकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:25 IST

लहान-मोठ्या व्यावसायिकांनी सोडला सुटकेचा श्वास

माथेरान : दिवाळी असल्याने सुट्ट्यांच्या या हंगामात देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देतात. सध्या माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे; यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अद्याप हॉटेलमध्ये फारशी गर्दी दिसत नसली, तरीसुद्धा लवकरच पर्यटन हंगाम आखी बहरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दिवाळीच्या हंगामात साधारणत: आठ ते दहा दिवस सर्वांनाच चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळतो.

२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; त्यावेळी जवळपास दोन ते अडीच वर्षे मिनिट्रेन सेवा बंद करण्यात आली होती. तीच परिस्थिती याही वेळेस अनुभवायला मिळते आहे. यावेळीसुद्धा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने काही ठिकाणी रेल्वेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नेरळ माथेरान ही सेवा बंद करताना रेल्वेच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी माथेरानच्या लोकप्रतिनिधीकडे, वारंवार गाºहाणे घालणाºया शिष्टमंडळाकडे न चा पाढा वाचून आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे याही वेळेस ऐन सुट्ट्यांच्या हंगामात मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध नसतानादेखील नियमितपणे येणारे पर्यटक आणि नवख्या पर्यटकांनी केवळ माथेरानवरील निस्सीम प्रेमापोटी माथेरानला पसंती दिली आहे. दस्तुरीपासून गावापर्यंत तीन किलोमीटर पायपीट करून ते येत आहेत. यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांना दिला मिळाला आहे. दिवाळी आणि पर्यटन हंगामासाठी बाजारपेठा सजल्या असून अनेक हॉटेलमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पॉइंटवरील छोट्या स्टॉल्स धारकांना पर्यटकांच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.पावसाळ्यात विविध पॉइंट भागात रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती, त्या ठिकाणी रस्त्यांची उत्तम प्रकारे डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना चालण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. मिनिट्रेनची अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे प्रयत्नात आहेत. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरू झाल्यावर पर्यटनात निश्चितच वाढ होण्यास मदत होईल. - प्रसाद सावंत, गटनेते, माथेरान नगरपरिषद

टॅग्स :tourismपर्यटनMatheranमाथेरान