शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हाउसफुल्ल, महानगरात संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 23:24 IST

Tourist : अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

रायगड : काेराेनाच्या प्रभावानंतर सरकारने आता वाॅटर स्पाेर्ट्स आणि नाैकानयनला परवानगी दिली आहे. नाताळ सणासह थर्टी फर्स्टचा दुहेरी आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात माेठ्या संख्येने पर्यटक दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये असे आदेश जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी अद्याप दिलेले नसल्याने संभ्रम कायम आहे.काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रे खुली केली आहेत. व्यवहार सुरळीत हाेत असल्याने बाजारांमध्येही काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. गेले सातआठ महिने नागरिक आपल्या घराबाहेर पडले नव्हते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हाेम क्वारंटाइन करून घ्यावे लागले हाेते. सातत्याने घरात राहिल्याने बाहेर पडताच आले नसल्याने जीवन कंटाळवाने झाले हाेते. आता काेराेनाचा उद्रेक बऱ्यापैकी थांबत असल्याने सरकारने पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वाॅटर स्पोर्ट्स नाैकानयन आणि मनाेरंजन पार्कचेही टाळे उघडले आहे. काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे, तर त्यापाठाेपाठ थर्टी फर्स्ट साजरा करण्यात येणार आहे. सरकारने वेळेवर शिथिलता दिल्याने पर्यटक माेठ्या संख्येने दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच फुलून गेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाहीत

- हाॅटेल, रेस्टाॅरंट, लाॅजिंग काॅटेजही पर्यटकांनी व्यापली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये काेराेनाने आपले रूप बदलल्याचे पुढे आले आहे. ७० टक्के या काेराेना विषाणूचा झपाट्याने प्रसार हाेत असल्याने सर्वच जगासाठी ही धाेक्याची घंटा आहे. नव्या काेराेनापासून बचाव करण्यासाठी परदेशी पर्यटकांवर सरकारने निर्बंध घातले आहेत. - गर्दी हाेऊ नये, यासाठी महानगरमध्ये सरकारने नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले नाहीत. - महानगरामध्ये नियम लावले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएमध्येही ते लागू हाेण्याची शक्यता आहे. आदेश नसल्याने व्यापारी, हाॅटेल व्यावसायिक, पर्यटक यांच्यामध्ये मात्र त्यामुळे संभ्रामाचे वातावरण आहे. 

टॅग्स :alibaugअलिबाग