शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:55 IST

रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे.

- अभय आपटेरेवदंडा : रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. गावाला ऐतिहासिक महत्त्व आहेच शिवाय आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगडची किनारपट्टी सुरक्षित असली तरी येथील रस्ते मात्र पर्यटनास मारक ठरत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे होणाºया वाहतूककोंडीमुळे अनेकदा पर्यटक त्रस्त होत असल्याचे दिसते.मुंबई-ठाण्यापासून दळणवळणास सोयीचे, शांत आणि परवडणारे असल्याने अनेक जण सेकंडहोम म्हणून या शांत परिसराला पसंती देतात. वीकेण्ड, वन डे पिकनिकसाठी अनेक जण रेवदंडा, अलिबागला पसंती देतात. मात्र, जाण्याऐवजी वन-डे पिकनिक होण्यासारखी ही ठिकाणे असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. अनेक ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊच शकत नाहीत. त्यामुळे पर्यटक रेवदंड्याला येण्याचे टाळत असल्याने पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. परिणामी, स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना दिसत नाही.साधारण १९८५ पर्यंत रेवदंडा हे अलिबाग तालुक्याचे रस्ता वाहतुकीसाठी शेवटचे टोक होते. कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि अलिबाग, रोहा व मुरु ड-जंजिरा तालुके रस्ता वाहतुकीने जोडले गेले. त्यात रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण बनले. पुढे १९८६ च्या सुमारास साळावमध्ये लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला. मुरुडमधील फणसाड अभयारण्य, काशिदचा किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरले आणि औद्योगिक वसाहत असलेला रोहा तालुक्यातील वाहनांची वर्दळ रेवदंडा बाजारपेठेतून होऊ लागली, त्यामुळे रेवदंडामध्ये वाहतूककोंडी होऊ लागली. रस्त्यावरील हातगाड्या, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी व अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्ग असला तरी धोकादायक वळणांमुळे पर्यटक बाजारपेठेतील रस्त्याला पसंती देतात.काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने किनारी भागात दिशादर्शक फलक लावले. मात्र, याच ठिकाणी दर्शनी भागात मच्छीमार्केट थाटल्याने पर्यटक हा मार्ग टाळू लागले. पारनाका, जुनी देना बँक या ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाहीत, इतका अरुंद रस्ता असल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसरात रस्ता रुंदीकरण व पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील उपाहारगृह व्यावसायिकाने व्यक्त केले आहे.रेवदंड्यात लवकरच नवे मच्छीमार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे किनाºयावर जाणारा रस्ता मोकळा होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत व्यवस्था, आसनव्यवस्था केली जात आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.- मनीषा चुनेकर, सरपंच

टॅग्स :Raigadरायगड